esakal | विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या पुलांवरून अवजड वाहतूक अखेर बंद
sakal

बोलून बातमी शोधा

सिंदखेड राजा

विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या पुलांवरून अवजड वाहतूक अखेर बंद

sakal_logo
By
गजानन काळुसे

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : सिंदखेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा पुल म्हणजे विदर्भ मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा पुल म्हणून ओळखला जातो. परंतु मागील काही वर्षापासून सदर पुलाचे काम सुरू असतानाच त्यावरून अवजड वाहतूक सुरू राहते त्यामुळे नेहमी खडकपूर्णा पुल हा कागदोपत्री बंद करावा लागतो परंतु प्रत्यक्षामध्ये अवजड वाहतूक सुरूच असते.यासाठी ई-सकाळ ने ३१ ऑगस्ट रोजी बातमी प्रकाशित केल्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडून दखल घेवुन राहेरी येथील पुलाजवळ दोन्ही बाजूला अडथळा निर्माण करून अवजड वाहतुक बंद करण्यात आले आहे.

हेही वाचा: बुलडाणा : ॲग्रो एजन्सीला आग लागून लाखोंचे नुकसान

महाडची घटना झाल्यानंतर शासनाकडून जुन्या पुलाची ऑडिट करण्यात आले.खडकपूर्णा नदीवर सन १९७१ -७२ मध्ये पुल तयार करण्यात आला असुन त्याची लांबी १८७.६० मीटर लांबी आहेत. ऑडिट करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून पुलाची सविस्तर रचनात्मक तपासणी केली असता,पिलर क्रमांक ४ वरील दोन्ही बेअरिंग निकामी झाल्याचे निदर्शनास आल्याने सदर पुलावरील जड वाहतूककीस मोठ्या धोका संभवत असून अपघात घडण्याची शक्यता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते.त्यानंतर सन २०१७ झाली खडक पूर्णा पुलांचे दुरुस्तीचे काम करण्यात आले होते.

हेही वाचा: ऋषिपंचमी : भाविकांनी टेकविला श्रींच्या मुख्यप्रवेशद्वारावर माथा

राहेरी येथील पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.लगेच काही महिन्यांत पुलावरुन अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु काही महिन्यानंतर अडथळा तोडून अवजड वाहतुक सुरू झाली होती.सार्वजनिक बांधकाम विभाग व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग यांच्यामध्ये हस्तांतरणाचा घोळ पहायला मिळत होता.अखेर राष्ट्रीय महामार्गाकडुन विभागाकडून परत एकदा अडथळा उभारून वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे विदर्भाने मराठवाड्यात जोडणारा फुल परत एकदा बंद करण्यात आला.

हेही वाचा: ‘सिंदखेड राजाच्या राजवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या’

यापूर्वी करण्यात आले होते दुरुस्तीचे काम

खडकपूर्णा नदीच्या तळापासूनची उंची १९.५० मीटर उंची आहे. वरिष्ठ अधिकार्‍याकडून पाहणी केल्यानंतर पोच मार्गाची रुंदी वाढवणे क्रॅश बॅरिअर्स बसवणे व दुरुस्ती करणे आवश्यक होते सन २०१६ रोजी तांत्रिक सल्लागार इंजिनीयर एस.एस.गुप्ता सेवा निवृत्त मुख्य अभियंता भारतीय रेल्वे यांनी पुलाला त्वरित भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पुलाला कोणताही धोका नसल्याचा सांगण्यात आले, पिल्लार क्रमांक ४ वरील एक बेरिंग डिलोडिंग झाल्याचे सांगून तात्पुरती उपाययोजना म्हणून लाकडी ठोकळे बसण्याचा सल्ला दिला. त्यानंतर लगेच इंजिनीयर हेमंत कान्हेरे यांना पूल पाहण्यासाठी बोलवण्यात आले त्याच्यासोबतच्या सहकार्‍यांनी पाहणी करून पुलाच्या खालच्या भागाचे छायाचित्रण केले त्यानंतर त्यांनी जड वाहतूक त्वरित पर्यायी मार्गाने वळविण्याच्या सूचना केल्या.अवजड वाहतूक बंद करण्यात आले होती.त्यानंतर रिप्लेसिंग एक्सटिंग एक्सप्रेशन जॉईन, क्लिनिंग ,ग्रीसिंग ,लिफ्टींग, शिफ्टींग व रिफिक्सिंग स्टील सॉकेट बेरिंग त्यानंतर रोलर बेरिंग इत्यादी काम करण्यात आले होते. इत्यादी कामे होऊन सुद्धा परत एकदा पुलावरून अवजड वाहतूक बंद करून परत दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा: बुलडाणा : बापाचा खून करणाऱ्या मुलीस न्यायालयीन कोठडी

"राहेरी जवळ असलेल्या खडकपूर्णा नदीवरील पुल सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांना हस्तांतरित करण्यात आलेला आहे.पुलांच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेला अडथळा वाहनाकडून तोडण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडून पुलाच्या दोन्ही बाजूला अडथळ्याचे दुरुस्ती करून परत उभारण्यात आलेला आहे त्यामुळे अवजड वाहतूकीला आळा बसणार आहे.यापुढील पुलांची व वाहतूकीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागांची असणार आहे.त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे सुद्धा सहकार्य असणार आहे."

- सुरेश कजबे, सहाय्यक अभियंता, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

loading image
go to top