
निमवाडी परिसरातील सुपर स्पेशलिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी एक हजार २६ पदांची आवश्यकता आहे. परंतु शासनाने राज्यातील चार सुपर स्पेशलिटी रुग्णालयांमध्ये प्रथम टप्प्यांसाठी केवळ ८८ पदांची निर्मिती करण्यास मंजुरी दिली असून अकोला जिल्ह्यासाठी केवळ २२३ पदं मंजुर केले आहेत.
अकोला : निमवाडी परिसरातील सुपर स्पेशलिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी एक हजार २६ पदांची आवश्यकता आहे. परंतु शासनाने राज्यातील चार सुपर स्पेशलिटी रुग्णालयांमध्ये प्रथम टप्प्यांसाठी केवळ ८८ पदांची निर्मिती करण्यास मंजुरी दिली असून अकोला जिल्ह्यासाठी केवळ २२३ पदं मंजुर केले आहेत. त्यामळे येथील रुग्णालयास कमी मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यामुळे कमी मनुष्यबळात रुग्णालय सुरू झाल्यास आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढेल व रुग्णांना सुद्धा योग्य आरोग्य सुविधा मिळेलच यासंबंधी शंका व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णांना योग्य दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यात चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती. त्याअंतर्गत हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री सदर चारही इमारतींपैकी अकोल्यातील इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे सदर इमारत कोरोना महामारीच्या काळात पांढरा हत्ती ठरत असल्याची ओरड होत होती. परंतु आता शासनाने पदनिर्मिता मंजुरी दिल्यामुळे सुपर स्पेशलिटी रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार सुरू होण्याची शक्यता असली तर आवश्यक पदांच्या तुलनेत अल्प पद मंजुर केल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरीक्त ताण वाढेल. हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच शासनाने मंजुर केलेली पदं हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार विसरले रक्ताचे नाते; वडिलांचे मुलीला तर काकाचे काकूला चॅलेंज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी हवे १०२६ पदं हेही वाचा - आता बुलेटचा फटाका फुटला तर थेट जप्ती! ‘जीएमसी’वर वाढणार ताण (संपादन - विवेक मेतकर) |
|||