esakal | नवे पूल, रस्ते भरावात शास्त्रशुद्ध धोरणांची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

नवे पूल, रस्ते भरावात शास्त्रशुद्ध धोरणांची गरज

महापुराचा धोका वाढवणाऱ्या बाबींमध्ये रस्त्यांचा भराव हे एक महत्त्वाचे कारण पुढे येत आहे.

नवे पूल, रस्ते भरावात शास्त्रशुद्ध धोरणांची गरज

sakal_logo
By
गणेश शिंदे

जयसिंगपूर : महामार्ग आणि जिल्हामार्ग (highway) रस्त्यांच्या भरावावरून नजीकच्या काळात तालुक्यात आंदोलनाची रणनीती आखली जात आहे. महापुराचा धोका वाढवणाऱ्या बाबींमध्ये रस्त्यांचा भराव हे एक महत्त्वाचे कारण पुढे येत आहे. रस्त्यांचा भराव आणि उंची वाढवत असताना शास्त्रशुद्ध अभ्यासाची गरज आहे. याकरिता जलसंपदा विभाग आणि बांधकाम विभागात याकरिता समन्वय हवा. या अभ्यासातून रस्ते आणि पुलांच्या भरावाचा विचार झाला नाही, तर महापुराचा (flood) धोका शिरोळ तालुक्यासह (shirol) नदी काठच्या गावांना नेहमीच सोसावा लागणार आहे.

महापुराने नदीकाठच्या गावांचे सातत्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेती आणि घरांचे होणारे नुकसान त्यानंतर प्रशासकीय पातळीवर पंचनामे, नुकसान भरपाई अशी यंत्रणा काम करते. शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी पूरग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी आंदोलन सुरू केली आहेत.

हेही वाचा: अन् 14 दिवसात तिच्या चेहऱ्यावर आली ‘मुस्कान’

पूरग्रस्तांना न्याय मिळतो हे जरी खरे असले तरी सततचा महापूर टाळण्यासाठी शासन पातळीवर महापुराची नेमकी कारणे शोधून त्यावर प्रभावी उपाय योजना राबविण्यासाठी शासनावर दबाव टाकण्याची गरज आहे. जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने महापुराची कारणे शोधून त्यावरील उपाय योजनांसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महापुराच्या कारणांपैकी चर्चेतील एक कारण म्हणजे नदीकाठावरील गावागावात वाढणाऱ्या रस्त्यांची उंची.

गेल्या दहा ते पंधरा वर्षात रस्त्याची उंची वाढल्याने महापुराचा धोका अधिक गडद बनला आहे. रस्ते बांधणी करत असताना त्याचा महापुराशी संबंध जोडला गेला पाहिजे. हे झाले नसल्याने नदी काठावरील शेती आणि घरे पाण्याखाली जात आहेत. पूरग्रस्त संघटनांनी महापूर कायमस्वरूपी टाळण्यासाठी शासनाकडे नेमकी कारणे आणि त्यावरील उपाय योजनांसाठी आग्रही रहाण्याची गरज आहे. अन्यथा सातत्याने महापूर आणि त्यानंतर आंदोलनांचा पूर हे समीकरण नित्याचे होऊन बसणार आहे.

हेही वाचा: पोलिस दलातील 'या' 3 जागेसाठी होणार रस्सीखेच; 5 हजार अर्ज दाखल

या उपाययोजनांचा विचार होण्याची गरज

  • नदीपात्रातील वाळू उपसा करण्याची गरज

  • पिलरवरील पुलांची निर्मिती

  • धरणांमधील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढविणे

  • नदी, उपनदी, ओढा, नाला यांची चार टप्यात खोलीकरण, रुंदीकरण मोजणे

  • नव्याने होणारे पूल, बंधारे व त्या अनुषंगाने होणारी विकास कामे करताना पर्यावरणीय, सामाजिक, आपत्ती विषयक परिणामांचा अभ्यास करून मगच त्यांना परवानगी मिळावी

  • आजवर दिलेल्या आशा परवान्यांचे पुनरावलोकन करून श्वेतपत्रिका काढावी

  • पुररेषा निश्चित करून मार्गातील अतिक्रमणे रोखणे.

"नदीकाठच्या गावांमध्ये रस्त्यांची उंची वाढत असल्याने महापुराचा धोका निर्माण होण्यामागचे एक प्रमुख कारण आहे. सततचा महापूर, पंचनामे, मिळणारी तोकडी मदत हे चक्र आता थांबले पाहिजे. महापुराची नेमकी कारणे आणि त्यावरील प्रभावी उपायांसाठी आंदोलनाची रणनीती आखली जाणार आहे."

- राजू शेट्टी (अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

loading image
go to top