औरंगाबादेत ३०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल
औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २) टोमॅटोची १६३ क्विंटल आवक झाली. त्यांना ३०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये २३ डिसेंबरला टोमॅटोची ११७ क्विंटल आवक झाली होती. त्यांना ३५० ते ६५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २४ डिसेंबरला १२७ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २८ डिसेंबरला ११८ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ४०० ते ६५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ३० डिसेंबरला १३१ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३१ डिसेंबरला १०६ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ७०० ते १३०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ८०० रुपये
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोची आवक वाढली, पण टोमॅटोचे दरही काहीसे स्थिर राहिले, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोची आवक रोज १०० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून टोमॅटोच्या आवक आणि दराची परिस्थिती काहीशी अशीच आहे. टोमॅटोची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ४०० रुपये आणि सर्वाधिक ८०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही टोमॅटोची आवक १०० ते १५० क्विंटलपर्यंत होती. प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला.
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही टोमॅटोची आवक काहीशी कमी प्रतिदिन ५० ते १०० क्विंटलपर्यंत होती. पण, दर मात्र स्थिरच राहिले. या सप्ताहात टोमॅटोला किमान २०० रुपये, सरासरी ४०० रुपये आणि सर्वाधिक ८५० रुपये असा दर मिळाला. आता पुन्हा किरकोळ चढ-उतार वगळता आवक आणि दर ‘जैसे थे’ आहेत. येत्या काळातही टोमॅटोच्या आवकेवरच दराचे गणित अवलंबून असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
सांगलीत दहा किलोस ५० ते १५० रुपये
सांगली : येथील शिवाजी मंडईत टोमॅटोच्या आवकीत वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. २) टोमॅटोची ७०० ते ८०० क्रेट (एक क्रेट २० किलोचे) आवक झाली. त्यांना प्रति दहा किलोस ५० ते १५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
मंडईत जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज, विटा तालुक्यांसह शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून टोमॅटोची आवक होते. बुधवारी (ता. १) टोमॅटोची ७०० ते ८०० क्रेट आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस ५० ते १५० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. ३१) टोमॅटोची ८०० ते ९०० क्रेट आवक झाली. त्या वेळी ६० ते १८० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. ३०) टोमॅटोची ६०० ते ७०० क्रेट आवक झाली. दर ६० ते १५० रुपये असा मिळाला. मंगळवारी (ता. २९) टोमॅटोची ६०० ते ७०० क्रेट आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस ६० ते १५० रुपये असा दर मिळाला. पुढील सप्ताहात टोमॅटोची आवक आणि दर स्थिर राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये
नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १) टोमॅटोंची आवक ७१६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये असा दर मिळाला, सर्वसाधारण दर ११०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
मंगळवारी (ता. ३१) टोमॅटोची आवक ८०६ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १४०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ८७५ रुपये होता. सोमवार (ता. ३०) टोमॅटोची आवक ९८० क्विंटल झाली. त्यास ५०० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ९०० मिळाला. रविवार (दि. २९) रोजी टोमॅटोची आवक १२०० क्विंटल झाली. त्यास ५०० ते १४०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण सर ११०० मिळाला. शनिवार (ता. २८) रोजी टोमॅटोची आवक ८२० क्विंटल झाली. त्यास ५०० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण सर ११२५ मिळाला. शुक्रवारी (ता. २७) टोमॅटोची आवक १०५० क्विंटल झाली. त्यास ४५० ते १३०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० होते. गुरुवार (ता. २६ ) टोमॅटोची आवक १०९६ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८७५ होते. गेल्या तीन दिवसांपासून आवक कमी झाली असून दरात किंचित सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अकोल्यात १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर
अकोला - येथील जनता भाजी बाजारात गुरुवारी (ता. २) टोमॅटो १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. बाजारात सुमारे ८०० क्रेटपर्यंत टोमॅटोची आवक झाली.
सध्या ढगाळ वातावरण असल्याने टोमॅटो पिकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आवक सरासरी ८०० क्रेटपेक्षा अधिक आहे. हा संपूर्ण माल जिल्ह्यातील विविध भागातून विक्रीला येत आहे. एका क्रेटमध्ये १८ ते २० किलो टोमॅटो असतो. क्रेटला २०० ते ३०० दरम्यान दर मिळाला. गुरुवारी उत्कृष्ट दर्जाचा टोमॅटो १२०० ते १५०० रुपये क्विंटल दराने विक्री झाला. तर दुय्यम दर्जाच्या टोमॅटोला ९०० ते १२०० पर्यंत दर होता. आवक वाढलेली असल्याने तसेच मागणी कमी झाल्याने दर सध्या उतरल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. टोमॅटोची किरकोळ विक्री २० ते ३० रुपयांदरम्यान प्रतिकिलोने होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.