Tractor
Tractor 
अ‍ॅग्रो

ट्रॅक्टरची यंदा विक्रमी विक्री होणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ट्रॅक्टरच्या विक्रीत उच्चांकी वाढ होण्याची शक्यता ‘इंडिया रेटिंग’ या संस्थेने म्हटले आहे. या आधीच्या २०१४ च्या ६ लाख ९६ हजार ८२८ ट्रॅक्टर विक्रीचा आकडा यंदा पार होण्याची अपेक्षा आहे. 

या संस्थेने म्हटले आहे, की एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत ट्रॅक्टर उद्योगाने विक्रीमध्ये गरुड झेप घेत १६.६ टक्के वाढ नोंदविली आहे. या कालवधीत देशांतर्गत ६ लाख ५९ हजार १७० ट्रॅक्टर्सची विक्री झाली होती.

मागील काही वर्षांपासून ट्रॅक्टरविक्रीत सातत्याने वाढ होत आहे. दोन वर्षांपूर्वी सतत पडलेल्या दुष्काळानंतर झालेला चांगला मॉन्सून, पोषक वातावरणाने पीक उत्पादनात झालेली वाढ, तसेच सध्या शेतकऱ्यांना सहज मिळत असलेला पतपुरवठा आणि बिगर शेती कामासाठी वाढलेला ट्रॅक्टरचा वापर यामुळे विक्री वाढली आहे. मागील दोन वर्षांतील चांगल्या मॉन्सूनंतर पुढील वर्षी २०१९ च्या हंगामात चांगल्या मॉन्सूनची शाश्वत देता येत नसली तरी वर्ष २०१७ आणि वर्ष २०१८ मध्ये ट्रॅक्टर उद्योगात झालेली वाढ बघता २०१९ मध्ये ही वाढ कायम राहील असा अंदाज आहे. त्यामुळे २०१९ मध्येही ट्रॅक्टर विक्रीतील वाढ ही याच गतीने होईल, असेही या संस्थेने म्हटले आहे.

‘‘ट्रॅक्टर विक्री ही प्रामुख्याने मॉन्सूनवर आधारीत आहे. चांगला मॉन्सून नसेल तर याचा परिणाम उद्योगावर होतो. २०१५ व २०१६ या वर्षांमध्ये मॉन्सून चांगला झाला नसल्याने उद्योगाच्या विक्रीत १० टक्के आणि ९ टक्के घट झाली होती. तसेच महत्त्वाच्या चार ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या महसुलात ३ टक्के आणि ११ टक्के घट झाली होती. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (सीएसओ) नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित सकल मूल्यवर्धन दरात २०१८ मध्ये घट होणार असल्याचे सांगितले. मुख्यत्वे २०१८ मध्ये देशात असमान पाऊस झाला. काही भागात जास्त तर अनेक भागात कमी पावसाने खरिप आणि रब्बी पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रभाव पडला आहे. त्यामुळे शेती, वने आणि मासेमारी या क्षेत्रातील सकल मूल्य वर्धनाचा दर हा २०१७ मधील ४.९ टक्क्यांवरून २.१ टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचे सांगितले आहे’’, असेही या संस्थेने म्हटले आहे. 

ट्रॅक्टर खरेदीमध्ये शेती क्षेत्रात कर्जाची थोडी समस्या जाणवते. तसेच कर्ज परतफेडीची भीती निर्माण होते. सध्या विक्री होणाऱ्या एकूण ट्रॅक्टर्सपैकी जवळपास ४५ टक्के ट्रॅक्टर्स खरेदीदारांना संघटीत क्षेत्रातील संस्थांकडून कर्ज दिले जाते. कर्ज देताना शेतकऱ्याची आर्थिक क्षमता पाहिली जाते आणि ती शेतीवर अवलंबून असते. समजा २०१९ मध्ये चांगला मॉन्सून राहिला नाही, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक पातळीवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे ट्रॅक्टर विक्रीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. परंतु २०१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी आणि पूरक व्यवसायाला मदत करण्यासाठी ६३८ अब्ज 
रुपयांची तरतूद केली आहे. या क्षेत्रासाठी तरतूद केलेल्या निधीची उपलब्धता वेळेवर केली तर ट्रॅक्टर्स आणि शेती अवजारांची मागणी वाढू शकते आणि त्याचा सर्वात जास्त लाभ हा ट्रॅक्टर उद्योगाला होणार आहे, असेही नमूद केले आहे. 

एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या काळात महिंद्रा ॲन्ड महिंद्रा लि. आणि इस्कॉर्टस् लि. या दोन्ही कंपन्यांच्या देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत १८ टक्के आणि १७.५ टक्के वाढ झाली आहे.

राज्य सरकारांचे अनुदान
देशातील अनेक राज्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना २५ टक्क्यांपर्यंत अनुदान देतात. तर आसाम या राज्यात शेतकऱ्यांना तब्बल ७५ टक्के अनुदान ट्रॅक्टर खरेदीसाठी दिले जाते. ट्रॅक्टरमध्ये जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता असल्याने बिगर शेती वापरासाठीही मागणी वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम आणि पायाभूत उद्योगांमध्ये वापर वाढला आहे. जवळपास २० टक्के ट्रॅक्टरचा वापर बिगर शेती व्यवसायाठी केला जातो तर तब्बल ८० टक्के वापर हा शेतीसाठी केला जातो. तसेच सरकारने सुरू केलेल्या महामार्ग विकास कामासाठीही ट्रॅक्टर्सचा वापर वाढू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT