agrowon-app 
अ‍ॅग्रो

कोरोनाशी लढण्यासाठी  "ऍग्रोवन ई ग्राम' ऍप 

सकाळवृत्तसेवा

पुणे - ग्रामीण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या "ऍग्रोवन ई ग्राम' ऍपने कोरोनाविरूद्धच्या लढण्यासाठी अनेक अभिनव सुविधा तयार केल्या आहेत. खास ग्रामीण भागाची गरज ओळखून यात वेगवेगळ्या सुविधा आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींसाठी, ग्रामीण व्यक्तीसाठी या सुविधांचा वापर करता येईल. 

या ऍपमधील "कोरोना टॅब'मध्ये कोरोनाबद्दल बातम्या व खात्रीशीर माहिती मिळणार आहे. यात गावाचा डिजिटल आरोग्य सर्वे करता येणार असून, गावातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची माहिती डिजीटली गोळा करता येईल. गावात कोण आजारी आहे? कोण बाहेरून आलेलं आहे? आजारात सुधारणा किती आहे? अशा सर्व गोष्टींचा ट्रॅक ठेवता येणार आहे. त्यातील कोणाला कोरोनाची लागण होऊ शकते का? कोणाला होम क्वारंटाइन करायला पाहिजे का? याचीही माहिती कळू शकेल. ती प्रशासनाला पोचवता येईल. तसेच, त्यावर प्रशासन काय उपाययोजना करतय किंवा काय निर्णय घेतय, याचीही माहिती मिळेल. ही सर्व प्रक्रिया डिजीटली होईल. त्यासाठी प्रत्यक्ष व्यक्तीच्या घरी जायची गरज नाही. तसेच, लॉकडाउनदरम्यान वैद्यकीय सेवा, किराणा, गॅस अशा अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी घराबाहेर पडण्यासाठी ग्रामप्रशासनाला माहिती देण्यासाठी या ऍपमध्ये एक बटन आहे. 

या ऍपचा वापर करून ग्रामीण महाराष्ट्रातील जनता कोरोनाविरूद्ध सक्षमपणे लढू शकतील. त्यातून त्यांना कोरोनाबद्दल खात्रीशीर माहिती मिळेलच, शिवाय डिजिटल आरोग्य सर्वेक्षण फॉर्मच्या माध्यमातून गावाच्या आरोग्याचे रेकॉर्ड डिजीटली ठेवता येईल. 
- नीलेश शेजवळ, सीईओ ऍग्रोवन ऍग्रोटेक 

ग्रामपंचायत आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी "ई ग्राम' ऍपचा वापर केला जातो. सध्या कोरोनाच्या साथीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट घरोघरी न जाता "ऍप'मधून माहिती भरता येते आहे. त्यासोबत ग्रामपंचायतीच्या सर्व उपाययोजना ऍपमधून नागरिकांपर्यंत पोचवणे सहज शक्‍य होते आहे. 
- सौ. वसुंधरा शिवदास उबाळे,  सरपंच, वाघोली (ता. हवेली) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT