अ‍ॅग्रो

नाशिकमध्ये कोथिंबिरीला मागणी वाढली

ज्ञानेश उगले

नाशिक : येथील बाजार समितीत गत सप्ताहात कोथिंबिरीची ३० हजार जुड्यांची आवक झाली. या वेळी प्रति १०० जुडीस १०,००० ते १४,००० व सरासरी १२,००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची आवक मागणीच्या २५ टक्के इतकीच आहे. या स्थितीत नाशिक जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून मागणी वाढली आहे.

मार्केट यार्डात शुक्रवारी (ता.२७) १० ते १२ हजार रुपये शेकडा दराने कोथिंबीर विक्री झाली. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने पालेभाज्यांसह कोथिंबीर पिकालाही त्याचा मोठा फटका बसला होता. पावसामुळे कोथिंबिरीची रोपे कुजून गेली होती. तसेच वाढही खुंटलेली होती. त्यामुळे मार्केट यार्डात होणारी आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे.

स्थानिक बाजारपेठेसह परराज्यांतही सध्या कोथिंबिरीची मागणी अधिक आहे. मात्र कोथिंबीर मागणीच्या प्रमाणात आवक होत नसल्याने दर तेजीत आहेत. सध्या यार्डात दिवसाकाठी २५ ते ३० हजार जुड्यांची आवक होत आहे. गावठी आणि संकरित वाणाच्या काडीची कोथिंबीर टिकाऊ आणि चवीला पसंतीस उतरते. पण, बाजारपेठेत पाठविताना कोथिंबिरीचे वाहतुकीदरम्यान नुकसान होते. त्यामुळे प्रत खराब होऊन त्याचा विक्रीवर परिणाम होतो. म्हणून स्थानिक बाजारपेठेत कोथिंबीर विक्रीला व्यापाऱ्यांकडून प्राधान्य दिले जाते. मात्र मागणी अधिक असल्याने स्थानिक बाजारपेठेत कोथिंबिरीचा तुटवडा आहे. त्यामुळे ग्राहकांना जादा दर देऊनही कोथिंबिरीच्या दोन-तीन काड्याच मिळत आहेत. सध्या जिल्ह्यातून सिन्नर, कळवण, दिंडोरी, निफाड आणि नाशिक तालुक्यातून नाशिकच्या बाजार समितीत कोथिंबिरीची आवक होत आहे. 

जुलै महिन्यात सरासरी १३,००० रुपये शेकडा दर कोथिंबिरीला मिळालेला होता. सरासरी ७०००ते ८००० रुपये दर महिनाभर तेव्हा होता. मात्र आवक कमीच होती. ऑगस्ट महिन्यात कोथिंबिरीची आवक थोडी वाढलेली होती. त्यामुळे नीचांकी दर तीन हजार रुपये शेकडा होता. सप्टेंबर महिन्यात कोथिंबिरीला गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांतून मागणी वाढलेली होती. त्यामुळे या महिन्यात कोथिंबिरीची आवक चांगली असूनही दर तेजीत होते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला पावसाची उघडीप होती. नंतर परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. त्यात कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सध्या मार्केट यार्डात कोथिंबिरीची २५ ते ३० हजार जुड्यांची आवक होत आहे. मागणी आठपट असल्याने कोथिंबिरीला १०,००० ते १४,००० रुपये सरासरी दर मिळत आहे.

नाशिक बाजार समितीत कोथिंबिरीची साधारणपणे दीड लाख जुड्यांची आवक होते. मागील पंधरवड्यात ही आवक अवघी २५ ते ३० हजार इतकी झालीय. या काळात मागणी वाढल्याने तेजीचे दर मिळाले. येत्या सप्ताहात ही आवक व मागणीचे हेच चित्र राहील, अशी स्थिती आहे.
- अरुण काळे, सचिव, नाशिक बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT