seed-storage 
अ‍ॅग्रो

बियाण्यांची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना

डॉ. व्ही. व्ही. दळवी, भागवत चव्हाण

बियाण्यांची साठवणूक करताना बियाण्यांतील ओलाव्याचे प्रमाण आणि बीज भांडारातील तापमान व वातावरणातील आर्द्रता यांचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे तापमान व वातावरणातील आर्द्रता याकडे विशेष लक्ष द्यावे. याशिवाय प्रतिबंधात्मक उपायांनीही बियाण्यांची साठवणूक क्षमता वाढविता येते.

बियाण्यांची साठवणूक प्राणवायुविरहित जागेत सुरक्षितपणे करता येते. नत्रवायू हा इतर कुठल्याही वायूपेक्षा बियाण्यांचे साठवणुकीतील आयुष्यमान वाढविण्यात महत्त्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे बियाण्यांची काढणी करताना व त्यावर प्रक्रिया करताना बियाण्यास होणारी इजा ही बहुतेक करून साठवणुकीच्या काळात उगवण शक्ती कमी होण्यास कारणीभूत ठरते. आनुवंशिकतासुद्धा बियाण्यांची साठवणूक शक्ती जास्त अथवा कमी असण्यासाठी कारणीभूत असते.

अ) प्रतिबंधात्मक उपाय 
मळणी करताना खळे कोठारांपासून लांब अंतरावर असावे. बियाणे चांगले वाळवावे. ज्यामुळे बियाण्यातील ओलावा दहा टक्क्यांपेक्षा कमी होईल. या ओलाव्यामध्ये किडीचे प्रजनन होण्याची शक्यता कमी असते.

रिकामी पोती, कणग्या, साठवणुकीची जागा तसेच वाहतुकीची साधने स्वच्छ करून कीडरहीत करावी.

साठवणुकीच्या जागेतील भिंतीचे छिद्र व बारीक भेगा सिमेंटने लिंपून घ्याव्यात, कारण त्यात कीटक वास्तव्य करतात. उंदराची बिळे असल्यास काचेचे तुकडे, दगड टाकून सिमेंटने बुजवून घ्यावीत. उंदरांनी प्रवेश करू नये यासाठी दरवाजे, खिडक्या घट्ट लावाव्यात. दरवाजाखाली गॅल्व्हनाईजचा पत्रा बसवून घ्यावा.

उंदीर तसेच पक्ष्यांना प्रतिबंध करण्यासाठी खिडक्यांना लोखंडी तारेच्या जाळ्या बसवाव्यात.

रिकामे गोदाम भिंतीवर/पृष्ठभागावर तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशकाची फवारणी करावी.

शक्यतो नवीन गोण्या/पोती वापरावीत. जर जुने पोते वापरायचे असल्यास पोते गरम पाण्यात (५० अंश सेल्सिअस तापमानापेक्षा जास्त) १५ मिनिटे भिजवून नंतर सुकवून वापरावेत.

पोते डनेजवर (लाकडी फळ्या, पॉलिथिन चादर, बांबूच्या चट्ट्या) ठेवावेत आणि पोत्यांची थप्पी भिंतीपासून ३ फूट अंतरावर ठेवावी.

बियाणे साठवलेली जागा नेहमी स्वच्छ ठेवून दर १५ दिवसांनी बियाण्यांची तपासणी करावी. 

ब) गुणात्मक उपाय
यामध्ये रसायनविरहित व रसायनांच्या साहाय्याने किडींचा बंदोबस्त करता येतो.

१) रसायनविरहित उपाय
थंड तापमान पद्धत : बऱ्याचदा साठवणुकीतील किडी- विशेषत: बाल्यावस्थेतील या १४ अंश सेल्सिअस तापमानाखाली मरतात. गोठणबिंदूच्या खाली तापमान गेल्यास या किडींचा नाश होतो. साठवलेल्या बियाण्यामध्ये नैसर्गिक थंड हवा खेळवून त्यात थंडावा आणता येतो. त्याचप्रमाणे शीतपद्धतीच्या उपयोगाने मोठ्या प्रमाणात बियाणे थंड करता येते.

उष्ण तापमान पद्धत : अनेकदा साठवणुकीतील किडी या ५०-६० अंश सेल्सिअस तापमानास १० ते २० मिनिटात मरण पावतात. किडीच्या वाढीसाठी लागणाऱ्या‍या अनुकूल तापमानापेक्षा ५ अंश सेल्सिअसने तापमान वाढल्यास त्यांची वाढ थांबते. जवळजवळ सर्वच किडी ५० अंश सेल्सिअस तापमानास दोन तासांसाठी संपर्कात आणल्यास नाश पावतात. साठवणुकीपूर्वी सर्व बियाण्यास एकसारखा उष्ण प्रवाही हवेचा झोत, इन्फ्रारेड, जास्त पुनरावृत्ती वीज, अति उष्ण लहरी या पद्धतीचा अवलंब करतात.

नियंत्रित वातावरण पद्धत : या पद्धतीस हवाबंद साठवणूक असेही संबोधतात. बियाणे हवाबंद किंवा निर्वात माध्यमात साठवले असता बियाण्यांच्या तसेच कीटकांच्या श्‍वासोच्छ्वासामुळे साठवणुकीच्या माध्यमातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. कार्बन डायऑक्साइडमुळे कीटकांना श्‍वासोच्छ्वासास अडथळा निर्माण होऊन त्यांचे नियंत्रण होते. या तत्त्वाचा उपयोग करून बियाणे १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी साठवले जाते. साठवणुकीचे माध्यम उदाहरणार्थ, प्लॅस्टिकचा ड्रम, पत्र्याची कोठी इत्यादी हे हवाबंद असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे हवाबंद माध्यमांमध्ये बियाणे भरून त्यांच्या क्षमतेच्या ४० ते ५० टक्क्यांपर्यत कार्बन डायऑक्साइड वायू त्यामध्ये भरला असता बियाण्यातील कीटकांचे नियंत्रण होते.

निष्क्रिय घटक : बिनविषारी पदार्थ, उदा.- माती, राख, गारगोटी इत्यादीचा वापर करावा. जर किडींच्या शरीरातील ६० टक्के पाणी किंवा ३० टक्के वजनात घट झाली तर त्यांचा नाश होतो.

२) रासायनिक उपाय
रासायनिक उपायांमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याने धुरीजन्य कीटकनाशकाचा वापर शासनमान्य अधिकृत परवानाधारक धुरीकरण यंत्रणेमार्फतच करावा.

भागवत चव्हाण, ९४०४५५१००९
(कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT