Masala
Masala 
अ‍ॅग्रो

व्यवस्थापन मसाला पिकांचे...

डॉ. वैभव शिंदे,डॉ. सुनील घवाळे

नारळ, सुपारी बागेत अतिशय चांगल्या प्रकारे मसाला पिकांची वाढ होते. या पिकांची लागवडीपासून योग्य काळजी घेतल्यास अपेक्षित गुणवत्तापुर्ण उत्पादन मिळते.

जायफळ  

  • कोकण सुगंधा, कोकण स्वाद, कोकण श्रीमंती आणि कोकण संयुक्ता या जातींची लागवड करावी. या जातींचे चांगले उत्पादन मिळते.
  • सध्या लागवड केलेल्या रोपांवर पावसाळा संपल्यानंतर सावली करावी. 
  • जायफळ कलमे /रोपे पाण्याचा ताण सहन करू शकत नाही. यासाठी योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करावा. ठिबक सिंचनाव्दारे प्रति कलम प्रति दिन ३० लिटर पाणी द्यावे. 
  • झाडाच्या बुंध्याजवळ आच्छादन करावे. 
  • सुरुवातीच्या काळात कलमांच्या उंचीपेक्षा अधिक उंचीचा आधार देणे आवश्‍यक आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काळी मिरी 

  • पन्नियूर-१ ही जात अर्ध सूर्यप्रकाशात चांगली उत्पादन देते. 
  • पाण्याच्या ताणापासून मिरी वेल जपावेत. नियमित पाणी द्यावे. फळांचे घोस उंदीर, खार, सरडे खाणार नाहीत, गळ होणार नाही यांची काळजी घ्यावी. 
  • नवीन लागवडीला सावली करावी. प्रति वेलाला १० लिटर प्रति दिन ठिबक सिंचनाव्दारे पाणी द्यावे. 
  • जलद आणि हळुवार मर तसेच इतर रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेलीवर १ टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी. तसेच १ मीटर उंचीपर्यंत वेलीवर १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी. रोगट पाने व मेलेल्या वेली जाळून टाकाव्यात. (ॲग्रेस्को शिफारस)
  • बुशपेपर मिरीची जोपासना करताना बुंध्यामध्ये तण येणार नाही याची काळजी घ्यावी. 

ऑलस्पाईस  

  • सुकलेली फळे आणि पाने मसाल्यात वापरली  जातात. 
  • वाढीच्या टप्यातील रोपांना पाण्याच्या ताण देऊ नये. 
  • रोपांना आधार द्यावा. बुंध्यात आच्छादन करावे. 

लवंग  

  • मसाल्यात वापरली जाणारी लवंग म्हणजे झाडावरची कळी अवस्था. पूर्ण वाळलेल्या कळ्या काढून उन्हात वाळवल्या की लवंग तयार होते. 
  • या पिकास कडक उन्हाचा त्रास होतो. रोपे लहान असताना त्यावर सरळ ऊन पडले तर पाने करपतात, खोड काळे पडून खराब होते. म्हणून नवीन लागवड केलेली रोपे  तसेच वाढीच्या टप्यात असलेल्या झाडांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली करावी. 
  • पाण्याचा ताण पडणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. अन्यथा पाने गळतात, फांद्या सुकतात. प्रत्येक दिवशी प्रति झाड सरासरी २० ते २५ लिटर ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. 

कोकम 

  • कोकम अमृता आणि कोकम हातीस या जातींची लागवड करावी. 
  • कोकम हातिस जातीची फळे मोठी, जाड साल आणि गर्द लाल रंगाची आहेत. प्रति झाडापासून १५० किलो फळे मिळतात. हे मादी झाड असल्याने परागीकरण व फलधारणेसाठी कोकमाचे नर कलम किंवा ५ ते ६ टक्के रोपे बागेत लावणे गरजेचे आहे. 
  • कोकम अमृता जातीची फळे मध्यम आकार, जाड साल आणि आकर्षक लाल रंगाची आहेत. प्रति झाड १४० किलो उत्पादन मिळते. 
  • सध्या वाढीच्या टप्यातील झाडांच्या बुंध्यात आच्छादन करावे. पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.

- ०२३५२ - २५५०७७
(प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि. रत्नागिरी)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT