agricultural pumps
agricultural pumps Sakal
अ‍ॅग्रो

राज्यातील 100 व्यक्ती वा संस्थांकडे सर्वाधिक कृषी पंप थकबाकी

सकाळ वृत्तसेवा

कृषी पंप थकबाकीदारांकडील थकबाकीचा अभ्यास ऊर्जा विभाग आणि महावितरणने सुरू केला आहे.

मुंबई - राज्यात कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी (Arrears) 42 हजार कोटी रुपयांवर पोहचली आहे. यामध्ये सर्वाधिक थकबाकी असलेल्या 100 व्यक्ती वा संस्थांकडे 9.28 कोटींहून अधिक रक्कम थकित आहे. राज्यातील सर्वाधिक कृषी पंप (Agriculture Pump) थकबाकी ही पुणे जिल्ह्यातील सायगाव येथील शेतकरी सुभकांत पंढरीनाथ काळे यांच्याकडे असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्यामधीलच सी.श्रीनाथ पी.पी. मंडळी यांच्याकडे आणि तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद जिल्ह्यातील देवराव शिर यांच्याकडे थकबाकी असल्याचे ऊर्जा विभागाच्या अभ्यासात उघड झाले आहे.

कृषी पंप थकबाकीदारांकडील थकबाकीचा अभ्यास ऊर्जा विभाग आणि महावितरणने सुरू केला आहे. या अभ्यासात महावितरणची राज्यातील सर्वाधिक थकबाकी असलेल्या 100 शेतक-यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीचा अभ्यास केल्यानंतर 10 लाखांहून अधिक थकबाकी असलेले 20 शेतकरी वा संस्था राज्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या 20 थकबाकीदारांकडे एकूण 2 कोटी 63 लाख 82 हजार 410 रूपये थकित आहेत.

वसुलीसाठी ऊर्जा विभागाने कृषीपंप धोरण आखले असून सप्टेंबर 2020 पर्यंतच्या थकबाकीतील 50 टक्के रक्कम माफ करण्यात आली आहे. त्यानंतर सप्टेंबर 2020 पासून आजवरच्या चालू बिलाची रक्कम जोडून या धोरणांतर्गत देय थकबाकीचा आकडा महावितरणने जारी केला आहे. थकबाकीदारांकडे प्रत्येकी 10 लाख रुपयांपासून ते 33 लाख रुपयांपर्यंत महावितरणचे थकीत वीज बिल बाकी आहे. या थकबाकीदारांमुळे महावितरणवर कर्जाचा डोंगर मोठया प्रमाणात वाढत चालला आहे.

साखर पट्ट्यात सर्वाधिक थकबाकीदार

राज्यातील 36 पैकी 12 जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या 100 व्यक्ती वा संस्था आहेत. त्यांच्याकडे 9 कोटी 28 लाख 90 हजार 600 रूपये इतकी थकबाकी आहे. 100 पैकी सर्वाधिक 32 थकबाकीदार हे अहमदनगर जिल्ह्यातील, त्यानंतर 21 थकबाकीदार हे पुणे जिल्ह्यातील तर 16 थकबाकीदार हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. रोख पीक म्हणून ओळखल्या जाणा-या साखरेच्या पट्ट्यातील 6 जिल्ह्यात 100 पैकी सर्वाधिक 81 थकबाकीदार आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात 2, बीड जिल्ह्यात एक , नांदेड जिल्ह्यात 10 असे 100 सर्वाधिक थकबाकीदारांपैकी एकूण 13 थकबाकीदार आहेत. विदर्भात नागपूर व अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एक असे केवळ दोन थकबाकीदार या यादीत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ४ थकबाकीदार आहेत.

10 सर्वाधिक कृषीपंप थकबाकीदार

- सुभकांत पंढरीनाथ काळे (सयगाव, राजगुरूनगर,पुणे) थकबाकी - 33,38,710 रुपये

- सी. श्रीनाथ पी.पी. मंडळी(केडगाव उपविभाग, जि, पुणे)- थकबाकी 20,32,800

- शिर देवराव गणपत ( चिखलठाणा, जि. औरंगाबाद) - थकबाकी - 15,66,580

- नलिनी कांतिलाल रणदिवे (पारगाव, ता. दौंड, जि.पुणे) थकबाकी -15,66,310

- मेसर्स जयंत वाटर (अढेगाव टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर)- 13,48,760

- श्री. चैवूनय भैरवनाथ (केडगाव, जेऊर उपविभाग, ता. करमाळा, जि. सोलापूर) थकबाकी -13,39,050

- रखमाजी डेअरी एग्रो प्रॉडक्ट (मंची हिल,संगमनेर, अहमदनगर) थकबाकी - 12,56,860

- तमडलगे सहकारी पाणी पुरवठा संस्था (दानोली, ता. शिरोळ, जि, कोल्हापूर) थकबाकी - 11,88,370

- सौ. गुणाबाई नामदेवर पवार (इस्लामपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) थकबाकी - 10,50,740

- संत सावता माळी पाणी पुरवठा संस्था ( अकोले, टेंभूर्णी उपविभाग, ता. माढा, जि. सोलापूर) थकबाकी - 10,34,020

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT