अ‍ॅग्रो

वृक्षसंगोपन केल्यास सातबारा मिळतो मोफत

मुकुंद पिंगळे

नाशिक : पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्षसंगोपन आणि संवर्धन गरजेचे आहे. अलिकडच्या काळात स्वतंत्र जंगल निर्मिती शक्य नसली तरी पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर रोप लागवड करून त्यांचे संगोपन करता येते.यातून दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य आहे. हीच बाब ओळखून सुरगाणासारख्या आदिवासी तालुक्यातील खोकरविहीरचे तलाठी एस.बी.शेलार यांनी वृक्षसंगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा स्वखर्चाने मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 

झाड जगविणे ही काळाची गरज आहे आहे,याच उद्देशाने  आदिवासी पाड्यावर वृक्ष लागवडीसोबत संगोपनाची चळवळ रुजविण्यासाठी एस.बी.शेलार यांनी तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून वृक्ष  संगोपन व जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे|पक्षीही सुस्वरे आळवीती" हा  संतविचार  प्रसिद्धी पत्रकावर छापून आदिवासी गावांमध्ये मुख्य ठिकाणी लावण्यात आले आहे.  या उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी कोतवालांची मदत घेऊन परिसरात दवंडी,थेट भेटी दिल्या जात आहेत.  सातबाऱ्याची फी ही अवघी १५ रुपये आहे. मात्र जनजागृती हा उद्देश समोर ठेऊन आदिवासी पाड्यांवरील शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले जात आहे. तलाठी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी शेती, घर परिसरात वृक्षाचे योग्य संगोपन करावे आणि त्याचा फोटो तलाठी कार्यालयास कळविल्यानंतर सातबारा मोफत देण्यात येत आहे. 

ग्रामविकासाच्या कार्यात वृक्षलागवड व संगोपन चळवळ वृंद्धीगत व्हावी हा मुख्य उद्देश आहे.सातबाऱ्याची रक्कम मोठी नाही, मात्र वृक्ष संगोपन  चळवळ वाढीस लागावी,यासाठी हा उपक्रम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू करण्यात आला आहे. लावलेल्या वृक्षाचे योग्य संगोपन करावे अन या उपक्रमात सहभागी व्हावे अशी शेतकऱ्यांना आम्ही विनंती केली आहे.
-एस. बी. शेलार, (तलाठी, खोकरविहीर, ता.सुरगाणा, जि. नाशिक)

अशी आहे सातबारा देण्याची पध्दत   
तलाठी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या  कुठल्याही भागात झाड लावावे आणि त्याचे पालकत्व स्वीकारून जबाबदारी घ्यावी.शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन झाडांचे संगोपन व झाडासोबतचा एक फोटो तलाठी यांच्याकडे व्हाट्सॲपवर पाठवावा. असे करणाऱ्या खातेदारास मोफत सातबारा तलाठी कार्यालयामार्फत देण्यात येत आहे. आत्तापर्यंत तीस शेतकऱ्यांनी हा लाभ घेतला आहे. 

कार्यक्षेत्रातील गावे - खोकरविहीर, कहांडोळपाडा, खिर्डी, भाटी, बेलशेत, खोबळादिघर
एकूण शेतकरी संख्या :  साधारण पाच हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईच्या वायु प्रदुषणाची क्रिकेटपटूंना धास्ती! Sarfaraz Khan सह अनेक जणं 'मुखपट्टी' घालून खेळायला उतरले

Latest Marathi News Live Update : बारामतीत NDRF टीम दाखल; घटनास्थळी करणार पाहणी

Belgaum Schools : केपीएस मॅग्नेट योजनेमुळे हजारो सरकारी शाळांवर टांगती तलवार; बेळगाव जिल्ह्यात ग्रामस्थ रस्त्यावर

Google Photos: फोनमध्ये बोलून करु शकाल फोटोज एडिट, गुगलने लाँच केले भन्नाट फीचर

Indian Army Jobs 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! भारतीय सैन्यात स्पेशल भरती जाहीर; ट्रैनिंगनंतर लॉ स्टुडंट्स थेट लेफ्टनंट होणार

SCROLL FOR NEXT