aasegaon 
अ‍ॅग्रो

समृद्धीच्या कंत्राटदाराने शेतीचा घेतला अनधिकृत ताबा

प्रतिनिधी

अमरावती - समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराने संपादीत आणि मोबदला दिलेल्या जमिनीपैकी उर्वरित जमिनीचा बेकायदा ताबा घेतला. या ०.१६ आर. क्षेत्रावरील संत्र्याच्या ३० झाडांसह तार कंम्पाऊंड तसेच टिनाचे घर या साहित्याची नासधूस केल्याचा आरोप धामणगावरेल्वे तालुक्‍यातील आसेगाव येथील शेतकरी रामाश्रय भगत यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नुकसानभरपाईची मागणीही त्यांनी केली आहे. 

रामाश्रय भगत यांची आसेगाव शिवारातील गट क्रमांक २०५/२ मध्ये एकूण एक हेक्‍टर २१ आर. इतकी शेतजमीन होती. यातील १ हेक्‍टर ०५ आर. शेतजमिनीचे संपादन समृद्धी महामार्गाकरिता करण्यात आले. त्याचा कायदेशीर मोबदलाही त्यांना देण्यात आला. उर्वरित ०.१६ आर. जमीन रामाश्रय भगत यांच्या वहितीखाली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

या क्षेत्रावर त्यांची संत्र्याची तीस झाडे होती. त्यासोबतच या क्षेत्रावर त्यांनी टिनशेडचे घर, पाईपसंच तसेच तार कंम्पाऊंड देखील ठेवले होते. समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराने या क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करीत या साहित्याची नासधूस केली, असा आरोप रामाश्रय भगत यांनी केला आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करुन नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

शेतीविषयी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराने १६ आर. जमिनीवरील साहित्याची नासधूस केली. इतक्‍या लहान क्षेत्राची मोजणी होत नसल्याचा दावा त्याकरिता त्यांनी केला आहे. परंतु, जमिनीचा ताबा घेताना त्याकरिता रीतसर भूसंपादन करून मोबदला देण्याची गरज आहे. 
- रामाश्रय भगत, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Chaitra Ekadashi : लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात 'या' तारखेपर्यंत VIP दर्शन पूर्णपणे बंद; विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी हा नियम जाणून घ्या

Iran Missile Attack Near India : युद्धाची धग भारतापर्यंत, इराणचा हिंद महासागरातल्या बेटावर क्षेपणास्त्र हल्ला

Multibagger Stock: 17 रुपायांवरून 1166 रुपयांपर्यंत झेप! 3 वर्षांत 6600% रिटर्न; बाजार कोसळत असतानाही हा शेअर तेजीत

Latest Marathi News Live Update : मुंबईसह ७ राज्यांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट, ९ दहशतवाद्यांना अटक

‘स्ट्रगलर साला’नंतर विजू माने घेऊन येत आहेत हा धमाल सिनेमा ! थाटात मुहूर्त संपन्न

SCROLL FOR NEXT