Sugarcane
Sugarcane 
अ‍ॅग्रो

ऊस वाढीसाठी गंधक फायदेशीर

नरेश देशमुख

नत्र, स्फुरद आणि पालाशच्या जोडीला गंधकाच्या वापरामुळे उसाची उत्पादनक्षमता वाढते. पानातील हरितद्रव्यामध्ये विशेष सुधारणा होते. पिकाची गंधकाची गरज ही स्फुरदाएवढी असून, पिकातील त्याचे कार्य नत्राच्या कार्याशी मिळते जुळते आहे.  

उसाच्या शाश्वत उत्पादनासाठी 
खत व्यवस्थापनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या पिकाची अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. 
त्यामुळे सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खतही शिफारशीनुसार द्यावे लागते. उसाला लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत खतांची आवश्यकता 
असते. रासायनिक खतामधून नत्र, स्फुरद व पालाश या मुख्यअन्नद्रव्यांबरोबर दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य वेळेत द्यावीत.

अन्नद्रव्यांची गरज 
    चांगली उगवण, मुळ्या फुटण्यासाठी स्फुरद आणि पालाशची गरज.
    जोमदार फुटवे येण्यासाठी नत्र उपयुक्त.
    सल्फरमुळे क्लोरोफिल व प्रोटीनचे नियोजन होऊन प्रकाशसंश्लेषण क्रिया चांगली होते. पानामध्ये अन्ननिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. रसाची शुद्धता वाढून साखरेचा उतारा वाढतो.
    पीक पोषण शास्रानुसार गंधक हे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. पिकाची गंधकाची गरज ही स्फुरदाएवढी असून, पिकातील त्याचे कार्य नत्राच्या कार्याशी मिळते जुळते आहे.

गंधकाची कमतरता दिसण्याची कारणे
    पिकांकडून गंधकाचे भरपूर शोषण, गंधक-विरहीत खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर, गंधकाचे शोषण व पुरवठा यातील मोठी तफावत, सेंद्रिय खत वापराचा अभाव व काही प्रमाणात वापरलेल्या गंधकाचा पाण्याद्वारे होणारा निचरा या कारणांमुळे जमिनीत गंधकाची मोठ्या प्रमाणावर कमतरता दिसू लागली आहे.
    पिके फक्त सल्फेट स्वरुपातील गंधकाचे शोषण करू शकतात. मूलभूत गंधक जर कठीण खड्यांच्या स्वरूपात असेल तर त्याचे सल्फेटमध्ये रूपांतर होण्यास बराच कालावधी लागतो, त्यामुळे तो पिकास वेळेवर उपलब्ध होऊ 
शकत नाही.

दाणेदार गंधक खताचे फायदे 
दाणेदार गंधक खतात ९० टक्के मूलभूत गंधक व १० टक्के बेंटोनाइट आहे. मातीत ओलाव्याशी संपर्क आल्यावर या पेस्टाइलचे जलद विघटन होऊन मूलभूत गंधक पिकास त्वरित उपलब्ध होते. विघटन झालेल्या गंधकाचे ऑक्सिडेशन होऊन त्याचे सल्फेटमधे रूपांतर होते. याच स्वरूपात ते पिकांना त्याच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेत उपलब्ध होते. हे गंधक पिकास समप्रमाणात जमिनीत पेरून देता येते. 
    गंधक पिकांना जलद उपलब्ध होऊन उसाची जोमदार वाढ होते.
    नत्राची कार्यक्षमता वाढते. 
    जमिनीचा सामू सुधारल्याने स्फुरद, लोह व जस्त या अन्नद्रव्यांची उपलब्धता होते.
    जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. खत वापर क्षमता वाढते. 
    महत्त्वाच्या वाढीच्या टप्यात पिकांची अल्पकालीन व दीर्घकालीन गंधकाची गरज पुरविली जाते. 
    पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
    रसाची शुद्धता वाढून साखरेचा उतारा वाढतो. उसाची गुणवत्ता सुधारते, उत्पादनात वाढ होते.
(लेखक स्मार्टकेम टेकनॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंन्ट आहेत)

पीक पोषणामधील गंधकाची भूमिका
    नत्र, स्फुरद आणि पालाशच्या जोडीला गंधकाच्या वापरामुळे पीक उत्पादनक्षमता वाढते. 
    सुधारित खत वापराच्या परिणामकतेमुळे सूक्ष्म पोषणमूल्यांसह जमिनीतील सर्व उपलब्ध पोषणमूल्यांचे प्रमाण वाढते. 
    जमिनीतील सामू पातळी नियंत्रित करते, क्षारयुक्त जमिनीची गुणवत्ता वाढवते. 
    पानातील हरितद्रव्यामध्ये विशेष सुधारणा होते. परिणामी प्रकाशसंश्लेषणाची क्रिया अधिक प्रभावी होते. पिकांमधील स्टार्च, शर्करा, तेल, मेद आणि जीवनसत्त्वे या सगळ्यात सुधारणा होते. 
    वनस्पतीमधील आवश्यक अमिनो आम्लाचा ९० टक्के भाग यामुळे बनतो. उदा. वनस्पतीमधील प्रथिनांची उभारणी करणारे सिस्टीन, सिस्टाईन  आणि मिथिओनाईन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT