अ‍ॅग्रो

जास्त प्रमाणात पदार्थ सुकविणारे टनेल टाइप सौर ड्रायर 

हेमंत श्रीरामे, मयूरेश पाटील, किशोर धांदे

टनेल टाइप सोलर ड्रायरमध्ये गरम हवेचा वापर करून वाळविण्यासाठीचे पदार्थ कमीत कमी वेळात सुकवले जातात. बेदाणे, मसाल्याचे पदार्थ, मासळी इत्यादी पदार्थ मोठ्या प्रमाणात सुकविता येतात.

सौरऊर्जेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर पदार्थ सुकविण्यासाठी टनेल टाइप सौर ड्रायरचा उपयोग केला जाऊ शकतो. टनेल टाइप सौर ड्रायरचे मुख्य भाग पुढीलप्रमाणे आहेत. 

१. सौरऊर्जा संकलक
२. सुकवणी ट्रे
३. पारदर्शक आवरण 
४. गरम हवा बाहेर जाण्यासाठी चिमणी 


यामध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षित पॉलिकार्बोनेटची फिल्म अर्धवर्तुळाकार लोखंडी सांगाड्यावर घालण्यात येते. 

या आवरणाद्वारे सूर्यकिरणे ड्रायरमध्ये विना अडथळा शिरतात. 

ड्रायरचा तळभाग सिमेंट कॉंक्रिटचा असून त्यावर काळा रंग लावण्यात येतो.  

सूर्यकिरणांमधील ऊर्जा शोषून घेतली जाते. मात्र जास्त तरंग लांबीची तळाद्वारे उत्सर्जित ऊर्जा बाहेर न पडल्यामुळे आतील तापमानात वाढ होते. 

या ड्रायरची उंची माणूस सहज आतमध्ये जाऊन काम करू शकेल इतपत असते. त्याचे एका बाजूस साधारण १.६ बाय ०.७५ मी. आकाराचे दार असून त्याद्वारे ड्रायरमध्ये पदार्थ ठेवण्यात किंवा काढण्यात येतात. 

या ड्रायरची उभारणी पूर्व पश्चिम अशी असते. उत्तरेकडील भिंतीवर उष्णतारोधक आवरण देण्यात येते. ज्यामुळे त्या भागातील उष्णतेचा संभाव्य ऱ्हास टाळता येतो. एक्झॉस्ट पंख्याद्वारे आर्द्रतेचे नियंत्रण करण्यात येते. 

टनेल टाइप सौर ड्रायरच्या आतील बाजूस जमिनीवर उष्णता शोषक काळ्या रंगाचे आच्छादन केलेले असते. काळ्या रंगामुळे सौर ऊर्जा शोषली जाऊन संकलकामध्ये गरम हवेची निर्मिती होते. 

संकलकाच्या बाजूस थंड हवेच्या प्रवेशासाठी खालील बाजूस छिद्रे असून त्याद्वारे वातावरणातील थंड हवा संकलकामध्ये प्रवेश करते व उष्णतेमुळे ती गरम होते. 

संकलकाच्या आतील उत्तर बाजूस उष्णतारोधक पदार्थ वापरून ऊर्जेचा ऱ्हास टाळता येतो. 

टनेल टाइप सौर ड्रायरमध्ये अॅल्युमिनियम अँगल व सच्छिद्र जाळी वापरून वाळविण्यासाठीचे पदार्थ ठेवण्यासाठी ट्रॉली व ट्रे यांची रचना करण्यात आलेली असते. यांचा उपयोग पदार्थ पसरून ठेवण्यासाठी होतो. 

बाहेरील थंड हवा छिद्रांमधून आत येऊन उष्ण संकलकाच्या संपर्कात आल्यावर गरम होते, ज्यामुळे हवेतील आर्द्रता शोषण्याची क्षमता वाढते. अशा प्रकारे पदार्थातील आर्द्रता शोषली जाते. 

गरम हवेला दुसऱ्या कोणत्याही बाजूने जाण्यास मार्ग नसल्यामुळे व वजनात हलकी, गरम हवा वर सरकण्याच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे ही हवा चिमणीद्वारे बाहेरील वातावरणात सोडली जाते. 

या प्रक्रियेमध्ये गरम हवेचा वापर करून वाळविण्यासाठीचे पदार्थ कमीत कमी वेळात सुकवली जाते. या टनेल टाइप सोलर ड्रायरमध्ये मोठ्या प्रमाणात बेदाणे, मसाल्याचे पदार्थ, मासळी इत्यादी पदार्थ सुकविता येतात.  

 हेमंत श्रीरामे, ९४२२५४५९१५ 
 मयूरेश पाटील, ९०२१६८२३९५
(विद्युत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT