agro startup sakal
अ‍ॅग्रो

‘ॲग्री बिझनेस’ विकसित करणारे ‘वेसाटोगो’

स्टार्टअप विश्‍व

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतमाल काढायला आला असेल तर त्याला किती दर मिळणार याची चिंता शेतकऱ्यांना असते. त्यामुळे सध्या मार्केटची स्थिती काय आहे? हे समजून घेण्यासाठी त्यांना चार ठिकाणी फोन करावे लागतात किंवा प्रत्यक्ष मार्केटमध्ये जावे लागते. तसेच लागवडीपासून शेतमाल विकण्यापर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

माल बाजारात कसा पाठवायचा, त्यासाठी कोणती वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे. यासह शेतीविषयक विविध सेवा पुरविणाऱ्या ‘वेसाटोगो इनोव्हेशन’ (Vesatogo Innovations) या स्टार्टअपने शेतकऱ्यांचे काम सोपे केले आहे. तसेच शेतमालाला चांगली किंमत मिळवून देण्याचे प्रयत्नदेखील या स्टार्टअपच्या माध्यमातून केले जात आहेत. ‘ग्रामीक’ आणि ‘एफपीओ मॅनेजमेंट सिस्टिम’ असे दोन उपक्रम या स्टार्टअपकडून राबविण्यात येत आहेत.

‘जय जवान, जय विज्ञान’ ही संकल्पना डोळ्यापुढे ठेऊन आम्ही कृषी क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. ‘डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर’च्या आणि नाशिकमधील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील अडचणींचा शोध घेतला जात होता. त्यातून शेतमाल वाहतूक आणि पुरवठा साखळीतील अडचणी समोर आल्यात. डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअरच्या माध्यमातून अडचणींवर पर्याय शोधण्यासाठी अभियंत्यांना बोलविले. त्यासाठी मी अर्ज केला होता. त्यातून या स्टार्टअपची सुरुवात झाली, अशी माहिती दीक्षित यांनी दिली.

लागवड ते शेतमालाचे उत्पादन आणि ते बाजारपेठेपर्यंत नेण्यापर्यंतची साखळी या प्रकल्पाचे काम आम्ही करतो. एफपीओ मॅनेजमेंट सिस्टिमशी १२ हजारांहून अधिक शेतकरी जोडले आहेत. शेतमाल, खरेदी, दर निश्चिती, काढणी, पुरवठा, वाहतूक, विक्री या बाबी प्रणालीत समाविष्ट आहेत. या माध्यमातून आतापर्यंत ६८० कोटींची उलाढाल झाली आहे.

- अक्षय दीक्षित, सहसंस्थापक, वेसाटोगो

‘ग्रामिक’च्या माध्यमातून मार्केटची माहिती

ग्रामिक ॲपच्या माध्यमातून मार्केटची माहिती देण्यात येते. त्याचा वापर करीत व्यापाऱ्यांना मालाचे बुकिंग करता येते. त्यानंतर माल घेऊन जाण्याची कोणती वाहने उपलब्ध आहेत, याची माहिती तेथे पुरवली जाते.

एफपीओ मॅनेजमेंट सिस्टिम

या सिस्टिमअंतर्गत लागवड, शेतमालाची काढणी आणि काढणीनंतरची सेवा पुरविली जाते. मालाची मागणी कशी असेल, मार्केट विश्‍लेषण, माल कधी काढावा, मालाची काढणी केल्यानंतर त्याची गुणवत्ता कशी टिकवावी, गोदामाचे व्यवस्थापक, मालाच्या विक्रीसाठी उपलब्ध असलेले छोटे-मोठे मार्केट, ग्राहक आणि वेंडर, मालाचे वितरण व व्यवस्थापन करण्याची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येते.

स्टार्टअपची व्याप्ती...

  1. १२,००० हून अधिक शेतकरी कनेक्ट

  2. ५०,००० हून अधिक मालवाहतुकीच्या यशस्वी फेऱ्या

  3. १२०० टनाहून अधिक दररोजची मालवाहतूक

  4. ५०० हून अधिक दररोजच्या ऑर्डर

  5. ३० लाखांहून अधिक रोजची विक्री

  6. ३०,००० विविध व्यापाऱ्यांची नोंदणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT