12 buildings in the city are extremely dangerous 
अहिल्यानगर

सावधान ः नगरमध्ये आहेत 12 इमारती अतिधोकादायक

अमित आवारी

नगर : पावसाळ्यापूर्वी शहरातील अतिधोकादायक व धोकादायक इमारत मालकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. शहरात अतिधोकादायक 12 इमारती असून, महापालिकेकडून संबंधित घरमालकांना याबाबत सांगण्यात आले आहे.

पावसाळ्यात इमारत पडून काही दुर्घटना झाल्यास त्यास मालक जबाबदार असेल. शिवाय शहरातील धोकादायक 122 इमारतींसंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. घरातील या अतिधोकादायक इमारती न पाडल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील 12 इमारती अतिधोकादायक असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. या इमारतींच्या मालकांना नोटिसाही दिल्या आहेत. या इमारती संबंधित इमारत मालकांनी न पाडल्यास महापालिका या इमारती उतरवून घेईल, असे कळविण्यात आले आहे. 

113 इमारती धोकादायक असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यात शहरातील गंजबाजारात तीन गल्लीत एक धोकादायक इमारत होती. या इमारतीच्या मालकाला महापालिका प्रशासनाने इमारतीसंदर्भात नोटीस दिली होती. त्यानुसार इमारतमालकाने धोकादायक इमारत पाडली.

शहरातील बाजारपेठेतील इमारती या परस्परांचा आधार घेत उभ्या आहेत. या इमारतीच्या शेजारील इमारतीचा एका बाजूचा आधार त्यामुळे गेला. पाडलेल्या धोकादायक इमारतीचे बांधकाम करताना नवीन पद्धतीने बांधकाम करण्यास सुरवात करण्यात आली. यात जवळच्या इमारतीच्या आधाराचा विचार झाला नाही. यातच रात्री शहरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे पहाटे या धोकादायक इमारतीशेजारील सुस्थितीत असलेली तीन मजली इमारत अचानक पडली होती. त्यामुळे संबंधित घरमालकाने अतिधोकादायक इमारत पडताना काही चूक झाल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्‍यता आहे;

शिवाय पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारतींपैकी कोणतीही इमारत संबंधित घरमालकाने पाडलेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अतिधोकादायक इमारती पाडण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. 

अतिधोकादायक इमारती शहरातील जुन्या भागात आहेत. हा भाग गल्ली-बोळांचा व अरुंद रस्त्यांचा आहे. या भागात बाजारपेठ असल्यामुळे नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. या अतिधोकादायक इमारती न पाडल्यास शहरात जीवित हानीची शक्‍यता आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT