14 deaths due to corona in Rahuri 
अहिल्यानगर

राहुरीत कोरोनामुळे १४ बळी, आज तीन गेले

विलास कुलकर्णी

राहुरी : तालुक्यात आज (शुक्रवारी) दिवसभरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात, राहुरी फॅक्टरी (पुरुष, वय 69), गुहा (पुरुष, वय 53) व सात्रळ (पुरुष, वय 82) येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 14 झाली आहे. आज दिवसभरात सतरा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे, कोरोना बाधितांच्या संख्या 397 वर पोहोचली आहे.

अनलॉक सुरू होईपर्यंत तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात होता. पहिल्या अनलॉक पासून तालुक्यात संसर्ग वाढला. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. समूह संसर्ग वाढत असल्याने, कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.

तालुक्यातील आज पर्यंत सोनगाव, बारागाव नांदूर, देवळाली प्रवरा, कात्रड, पाथरे, कृषी विद्यापीठ, वांबोरी, राहुरी फॅक्टरी, वळण, डिग्रस, गुहा, सात्रळ येथील प्रत्येकी एक व राहुरी शहरातील दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याने, धोक्याची घंटा वाजल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. असे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार केले जात आहे. परंतु, कोरोनाची भीती नाहीशी झाल्यासारखे, नागरिक घराबाहेर पडत असल्याने प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News : ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT