दगड खाण
दगड खाण 
अहमदनगर

नगर जिल्ह्यात सोळाशे कोटी रूपयांचे बेकायदा दगड उत्खनन

प्रा. सुनील गर्जे

नेवासे : नगर जिल्ह्यातील सोळाशे कोटी रुपयांचे १६ लाख ५५ हजार ६६२ ब्रास बेकायदेशीर दगड उत्खनन करण्यात आले. या प्रकरणी औरंगाबाद येथील खनिकर्म प्रादेशिक कार्यालयाच्या उपसंचालकांनी पंचनामा करुनही स्टोन क्रशर चालकांनी दंड भरला नाही. त्यामुळे संबंधित क्रशरचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटला चालविण्याची पूर्व परवानगी मिळावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब बाजीराव गायके यांनी राज्यपालांकडे केली आहे.

तक्रारीत गायके यांनी म्हटले आहे की, गौण खनिज विभागाने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवरुन जानेवारी २०१९ रोजी औरंगाबाद उपसंचालक प्रादेशिक कार्यालय, भूविज्ञान आणि खानिकर्म संचालनालय यांनी मोजणी केली. तसेच सदर गटांचा पंचनामा तलाठी व मंडळाधिकारी यांनी केलेला आहे. सदर स्टोन क्रशरधारकांना दंड करण्यात आला. सदर व्यक्तींकडून बाजारभावाच्या पाचपट रक्कम भरून घेण्याबाबत नोटिसा काढण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही नाही. (1600 crore stone excavation in Nagar district)

राज्यपालांच्या आदेशानुसार जर दंड भरण्यात आला नाही, तर सदर व्यक्तीची प्रॉपर्टी जप्त करणे गरजेची होते. अशी कुठलीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे दंड वसुलीची मुदत संपूनही कुठलीही दंडात्मक कारवाई तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हा गौण खजिन अधिकारी यांनी केलेला दिसून येत नाही. त्यामुळे या प्रकरणातील संबंधित व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी व स्टोन क्रशर चालकांविरुद्ध न्यायालयात खटला चालविण्याची पूर्वपरवानगी देण्यात यावी, अशी मागणी गायके यांनी राज्यपालाकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.

आपण मुख्यमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात पुराव्यासहित तक्रार देऊनही कुठलेही कारवाई होत नाही. शासनाचे अब्जावधी रुपयांचे नुकसान बेकायदा गौण खनिज उत्खननामुळे झाले झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याप्रकरणी राज्यपालांकडे न्यायालयीन लढ्यासाठी परवानगी मागितली आहे.

काकासाहेब गायके, माहिती अधिकार कार्येकर्ते

तालुका, उत्खनन झालेले गौणखनिज ब्रासमध्ये ः नेवासे : मुकिंदपुर १२५५८, खडकी १२५२१, मोरयाचिचोरा ६९४६. श्रीरामपूर : वळदगाव तीन ३ लाख ५८ हजार ३६५ ब्रास, निपाणी वडगाव १५३७६. नगर : नगर ९०३४, कापूरवाडी दोन लाख ४० हजार ९ ब्रास, पोखर्डी १७७१२९ व १८७९१७, खंडाळा तीन लाख ४८ हजार १२१ ब्रास, देहरे २८ हजार २८, इस्लामपूर २१७०२ व ३८५२२ , चास १६५३१, ३५२२ , १८४० ब्रास, कामरगाव १३०२६, बरगाव ६६४१. संगमनेर : पिंपळे ८४४१६, १८७९३ व ६४७६. अकोले : बेलापूर १५९८०, पिटा ६३८९ , देवठाण ३४९०, वासेरे ६०९१, वीरगाव ९९९४, पिंपळगाव निपाणी ९५२, येवले ५२९३.(1600 crore stone excavation in Nagar district)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara : पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT