Police Arrest sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : 1982 मधील दरोड्यातील आरोपीस 38 वर्षांनी अटक

पारनेर तालुक्‍यात 1982 मध्ये पडलेल्या दरोड्यात आरोपी सुरेश महादू दुधावडे याला अटक करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : पारनेर तालुक्‍यात 38 वर्षांपूर्वी दरोडा टाकणारा आणि गुन्ह्यात शिक्षा लागल्यापासून 15 वर्ष फरार असलेला दरोडेखोर सुरेश महादू दुधावडे यास पुणे येथील ठाकरवाडी (ता. जुन्नर) परिसरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि नारायणपूर पोलिसांच्या संयुक्‍त पथकाने पकडले. (Ahmednagar Crime News)

पारनेर तालुक्‍यात 1982 मध्ये पडलेल्या दरोड्यात आरोपी सुरेश महादू दुधावडे (हल्ली रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) याला अटक करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याने या शिक्षेविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले. खंडपीठाने या अपिलावर सुनावणी झाली. खंडपीठाने ही दरोड्याच्या गुन्ह्यात दोषी धरले.

सुरेश दुधावडे हा ता.14 ऑक्‍टोंबर 2005 पासून जामीन सुटल्यावर फरार झाला. दरोड्याच्या वेळेस तो वाडेगव्हाण येथे तात्पुरत्या स्वरुपात राहण्यास आलेला होता. त्याचा कोणताही पत्ता मिळत नव्हता.

खंडपीठाने त्याचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी सहाय्यक निरीक्षक गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार बबन मखरे, विशाल दळवी, सुरेश माळी, संदीप दरंदले, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांचे पथक स्थापन केले. या पथकाने आरोपीचा शोध घेतला. तो नारायणपूरजवळील ठक्करवाडी येथे राहत असल्याचे आढळून आले. नारायणपूरचे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पृथ्वीराज ताठे आणि पोलिस अंमलदार यांच्या संयुक्‍त पथकाने त्यास अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT