226 crore for water supply in Pathardi
226 crore for water supply in Pathardi 
अहमदनगर

पाथर्डीतील पाणीयोजनांसाठी सव्वादोनशे कोटींचा निधी

राजेंद्र सावंत

पाथर्डी : तालुक्‍यातील भगवानगड व 36 गावे पाणीयोजनेसह अन्य 32 गावांतील पाणीयोजनांसाठी 226 कोटी रुपयांच्या कृतिआराखड्याला जिल्हा परिषदेने मंजुरी दिली. 134 गावांतील पाणीयोजनांची कामे यात प्रस्तावित आहेत. 15वा वित्त आयोग व जलजीवन मिशनच्या माध्यमातून ही कामे केली जाणार आहेत. टंचाईचा सामना करताना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पंचायत समितीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग त्याची अंमलबजावणी करणार आहे. 

पाथर्डीची "दुष्काळी तालुका' म्हणूनच राज्याला ओळख. आजही काळेवाडी, हाकेवाडी व रांजणी येथे पाणीयोजना नाही. ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या 15व्या वित्त आयोगाचा 50 टक्के निधी पाणीयोजनेवर खर्च करण्याचा निर्णय झाला आहे. निधी कमी पडेल तेथे जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीयोजनेसाठी निधी दिला जाणार आहे. तसा कृतिआराखडा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजूर केला आहे. शेवगाव-पाथर्डी ग्रामीण पाणीपुरवठा योजना, भगवानगड व 36 गावे पाणीयोजना, तसेच 32 गावांत स्वतंत्र पाणीयोजनांची कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. 

भगवानगड व 36 गावांची योजना (दोनशे कोटींची) राबविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काम करीत आहे. शेवगाव-पाथर्डी ग्रामीण पाणीपुरवठा योजना व 32 गावांत स्वतंत्र पाणीयोजनेची (सव्वीस कोटी) कामे पंचायत समितीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करीत आहे. 

तालुक्‍यातील पाणीयोजनेची कामे करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पंचायत समितीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग काम करीत आहे. 226 कोटींच्या कृतिआराखड्याला मंजुरी मिळाली आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून व जलजीवन मिशनच्या माध्यमातून हा निधी मिळणार आहे. स्थानिक पदाधिकारी, ग्रामसेवक, पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग एकत्रितरीत्या ही कामे मार्गी लावेल. भगवानगड व 36 गावे पाणीयोजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. 
- अनिल सानप, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पाथर्डी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT