23 villages in Nagar, Rahuri, Parner again under Army's jurisdiction
23 villages in Nagar, Rahuri, Parner again under Army's jurisdiction 
अहमदनगर

पारनेर, राहुरी, नगर तालुक्यातील २३ गावे पुन्हा लष्कराच्या रडारवर, जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना

अमित आवारी

नगर ः युध्दाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना अधिनियमाने प्रदान केलेल्या अधिकारान्वये के.के. रेंज नगर लष्कराच्या गोळीबार क्षेत्रालगतचे क्षेत्र 15 जानेवारी 2021 ते 14 जानेवारी 2026 या कालावधीत जिवंत दारू गोळ्यासहीत मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी अधिसूचना क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या संदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. हे स्थलांतर टाळण्यासाठी तीन तालुक्‍यातील 23 गावांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता के के रेंजचा प्रश्‍न सुटला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले. 

ही ठिकाणे ही वेगवेगळ्या दिवसांकरिता वेगवेगळी लक्ष्ये साध्यासाठी प्रशिक्षणातील विविधता आणि त्याचबरोबर एखादे विशिष्ट गाव अथवा गावाच्या समुहाचे सततचे स्थलांतर टाळण्यासाठी निवडण्यात आली आहेत. या क्षेत्रातील फक्‍त अशीच गावे व धोकादायक क्षेत्र म्हणून असलेली क्षेत्रे ही सरावासाठी आवश्‍यक दिवशीच महसूल अधिकाऱ्यांमार्फत धोकादायक क्षेत्र म्हणून नोटीस देऊन खाली करण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत या क्षेत्रातील सर्व गावांबाबत वरील संपूर्ण कालावधी दरम्यान स्थलांतराची कारवाई केली जाणार नाही, असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे. 

के के रेंजसाठीच्या या वाढीव क्षेत्रात नगर जिल्ह्यातील तीन तालुक्‍यातील खासगी जमीन 10798.96 हेक्‍टर, सरकारी जमीन 3597.11 हेक्‍टर व वन जमीन 11223.62 हेक्‍टर आहे.

नगर तालुक्‍यातील देहरे, इस्लामपूर, शिंगवे, नांदगाव, सुजलपूर, घाणेगाव मधील जमिनींचा समावेश आहे. नगर तालुक्‍यामधील गावांतील खासगी जमीन क्षेत्र 991.27 हेक्‍टर, सरकारी जमीन 150.85 हेक्‍टर व वन जमीन 113.11 हेक्‍टर आहे.

राहुरी तालुक्‍यातील बाभुळगाव, जांभुळबन, जांभळी, वरवंडी, बारागाव नांदुर, कुरणवाडी, घोरपडवाडी, चिंचले, गडाखवाडी, दरडगावथडी, वावरथ या गावांतील जमिनींचा समावेश आहे.

राहुरी तालुक्‍यामधील गावांतील खासगी जमीन 4130.64 हेक्‍टर, सरकारी जमीन 2260.52 हेक्‍टर व वन जमीन 5657.76 हेक्‍टर आहे. पारनेर तालुक्‍यामधील वनकुटे, पळशी, वडगाव सावताळ, गाजदीपूर, ढवळपुरी या गावांतील जमिनीचा समावेश आहे.

पारनेर तालुक्‍यामधील या गावांतील खासगी जमीन 5677.05 हेक्‍टर, सरकारी जमीन 1185.74 हेक्‍टर व वन जमीन 5452.75 हेक्‍टर आहे. 
या गावांमधील समाविष्ठ असलेले सर्व्हे क्रमांक, गट क्रमांक व फॉरेस्ट कंपार्टमेंट क्रमांकनिहाय यादी संबंधित तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय व वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात देखील प्रसिध्द केली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कळविले आहे. 

या तालुक्‍यांतील गावांचा समावेश 
नगर - 6 
राहुरी - 12 
पारनेर - 5 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाचव्या आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT