Robbery esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : चाकुचा धाक दाखवुन अडीच लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपुर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील बेलापुर परिसरातील ओम साई पेट्रोल पंपासमोरील नेहे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी दरोडा (Robbery) टाकून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

चोरट्यांनी तीन ठिकाणी केला प्रयत्न

चोरट्यांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास प्रारंभी प्रकाश नाईक यांच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु आवाजाने युवराज नाईक यांना जाग आली असता त्यांनी तातडीने घरातील सर्व लाईट लावले. यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर नजिकच्या चाॅंदनगर येथे प्रवेश केला. तेथील स्थानिक नागरीकांनी चोरट्यांना पहाताच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या वाहनाच्या आवाजामुळे चोरटे तेथुनही पुढे सरकले. काही वेळाने नवले वस्तीवरील दादा कुताळ यांच्या वस्तीवर चोरटे गेले. तेथेही लोक जागे असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा ओम साई पेट्रोल पंपासमोरीस बाळासाहेब नेहे यांच्या घराकडे वळविला होता.

कुटूंबीयांना दाखवला चाकुचा धाक

नेहे यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाला लाथ मारुन चोरट्यांनी लाकडी दरवाजा उघडला. त्यानंतर चार चोरट्यांनी नेहे यांच्या घरात प्रवेश केला. तर एक जण घराबाहेर बसला होता. घरातील बाळासाहेब नेहे व पुष्पा नेहे या दोघांना चाकुचा धाक दाखवुन चोरट्यांनी एका बाजुला बसवुन घरात उचकापाचक केली. घरातील सोन्याची अंगठी, पोत व गळ्यातील मणीमंगळसूत्रासह कानातील झुबे असे चार तोळे सोन्याचे दागिने व ५७ हजार रुपये रोख घेवुन चोरट्यांनी अवघ्या दहा मिनीटांत धुम ठोकली. पहाटे तीन वाजेच्या सुमारास उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना दादा कुताळ यांनी चोर आल्याचे कळविल्यामुळे त्यांनी तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश दिला.

परंतु तोपर्यंत चोरटे चोरी करुन तेथून पसार झाले होते. काही वेळाने पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर कुऱ्हे वस्तीकडे कुत्री भुंकण्याचा आवाज आल्याने पोलिस हवालदार अतुल लोटके, पोलिस नाईक रामेश्वर ढोकणे, गणेश भिंगारदे, पोपट भोईटे, निखील तमनर, हरिष पानसंबळ हे त्या दिशेने गेले. परंतु तोपर्यत दरोडेखोर पसार झाले होते. दरम्यान, पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या पथकासह श्वानपथक व ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. तसेच पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांनी देखील घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. याप्रकरणी येथील शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हस्तांदोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates : भारतात प्रवेश करणाऱ्या 79 कैद्यांना अटक

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT