Bank privatization
Bank privatization esakal
अहमदनगर

300 बँक कर्मचाऱ्यांचा खासगीकरणाविरोधात एल्गार | Ahmednagar

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर (जि. अहमदनगर) : देशातील 14 बँकांचे तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी दुरदृष्टीने राष्ट्रीयकरण करुन, सर्वसामान्यांना बँकेची पायरी चढणे सोपे केले होते. आजवर देशाच्या आर्थिक प्रगतीत मोठा वाटा असलेल्या बँकांचे खासगीकरण (Privatization of Government Bank) करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. यामुळे बँकांचे सर्वसामान्य आर्थिक परिस्थीती असलेल्या ग्राहकांवर तसेच इतर घटकांवर होणाऱ्या दूरगामी परिणामांचा विचार करुन, सर्व बँकांचे कर्मचारी खासगीकरणाविरोधात एकवटले आहेत. यासाठी दोन दिवसांचा संप पुकारला असून, संगमनेरसह जिल्ह्यातील पाच तालुके व प्रमुख शहरांमधील सुमारे 300 कर्मचाऱ्यांनी दुचाकी फेरी (Bike Rally) काढून व सभा घेवून केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला.

या वेळी प्रसिध्दीला दिलेला निवेदनात बँकांच्या संपामुळे आपल्या ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून त्यांची दिलगीरी व्यक्त करीत त्यांची बाजू ऐकून घेण्याची विनंती केली आहे. त्यात म्हटले आहे, तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1969 साली देशातील एकुण 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते. त्यामुळे आज छोट्या गावातही बँक आली. शेतकरी, शेतमजुर, ग्रामीण कारागीर व लघु उद्योजकांना कमी व्याजदरातील कर्जामुळे उद्योग उभारता आले. या बँकांचे खासगीकरण झाल्यास, खाते उघडण्यासाठीचा खर्च वाढेल, छोट्या खातेदारांना कर्ज मिळणार नाही, चार्जेसच्या नावावर शोषण वाढेल. सक्तीच्या कर्जवसुलीसाठी जमिनी हडप होतील. कर्जावरील व्याजाचा दर खासगी बँका ठरवतील. शैक्षणिक कर्जे मिळणे दुरापास्त होवून, सरकारी योजना राबविणे मुश्किल होईल. जनतेची बचत व ठेव असुरक्षीत होईल. बँकांचा फायदा फक्त श्रीमंतांनाच होईल, ठेवरुपी पैशांचा वापर मोठ्या उद्योजकांना होईल. बँकांच्या बुडीताचे प्रमाण वाढेल अशी भीती व्यक्त केली.

स्वातंत्र्यापूर्वीचा शोषण करणारा सावकारी आणि गुलामीचा पाश पुन्हा वाढू नये यासाठी सर्व नागरिकांनी बँकांच्या खासगीकरणाला विरोध करुन राष्ट्रीय संपत्तीचा विनाश वाचवण्याची आवश्यकता आहे. कारखाना कार्यस्थळावरील इंदिरा गांधी यांच्या स्मृतीस्थळापासून सुरु झालेली दुचाकी फेरी शहरातील बस स्थानक, अकोले नाका, मेन रोड, दिल्ली नाका, नवीन नगर रोडमार्गे, जाणता राजा मैदान येथे सभा घेण्यात आली. नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईजचे हर्षद पाबळकर, स्टेट बँक ऑफिसर असोसिएशनचे वैभव कदम, अरविंद कचरे, ऑल इंडिया बँक ऑफिसर कॉन्फडरेशनचे सुधाकर जोशी आदींनी नफ्यातल्या बँकांच्या खासगीकरणाविरोधात घणाघाती टीकास्त्र सोडून, बेमुदत संपाचा इशारा दिला. या वेळी संगमनेर, अकोले, कोपरगाव, नेवासे, राहाता, राहुरी, शिर्डी, सोनई आदी ठिकाणाहून आलेले सुमारे 300 कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT