Tadippar Tadipaar
अहिल्यानगर

Ahmednagar Crime : अहमदनगर शहरातून ४६९ गुन्हेगार तडीपार

मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरात १६ व १७ जुलै कत्तलची रात्र व सवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच १७ जुलैला आषाढी एकादशी साजरी होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरात १६ व १७ जुलै कत्तलची रात्र व सवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच १७ जुलैला आषाढी एकादशी साजरी होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने शहरात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. नगर शहर व भिंगार परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या ४६९ जणांना दोन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली.

नगर शहरात मागील काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, तणाव निर्माण होईल, अशा घटना घडलेल्या आहेत. त्यातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे देखील दाखल आहेत. या घटनांसंदर्भात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही प्रश्‍न उपस्थित झाला होता.

१६ व १७ जुलैला मोहरमनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येत आहे. १७ जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी नगर शहर पोलिस प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांवर कारवाई सुरू केली आहे.

मिरवणूक मार्गावर वाहनांना बंदी

मोहरमनिमित्त शहरात मुस्लिम बांधव ताबुत व सवारी मिरवणूक काढतात. त्यापार्श्‍वभूमीवर मिरवणूक मार्ग नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी हे आदेश काढले आहेत. बुधवारी (ता. १७) दुपारी १२ पासून ते रात्री ८ वाजेपर्यंत मिरवणूक मार्गावर वाहनांना बंदी राहणार आहे.

असा आहे मिरवणूक मार्ग

छोटे बारा इमाम कोठला- फलटण चौकी - कोंड्यामामा चौक -मंगलगेट हवेली- कामठीपुरा- सरदार पटेल रोड- काच मशिद -आडते बाजार- पिंजार गल्ली -पारशा खुंट- जुना कापड बाजार -हॉटेल देवेंद्र -खिस्त गल्ली -बुरुड गल्ली- जुनाबाजार -पंचपीर चावडी - मनपा कार्यालयासमोरुन सबजेल चौक कॉर्नर -जुने कोर्ट पाठीमागून -शिवाजी पुतळा- टांगे गल्ली चौक -चौपाटी कारंजा -सावरकर पुतळा- दिल्ली गेट -सिद्धिबाग करबला मशिद- नीलक्रांती चौक- बालिकाश्रम रोड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard In Kolhapur : पन्हाळगड पायथ्याजवळ आढळला मृत बिबट्या, कारण अद्याप अस्पष्ट

Donald Trump : दिवाळीआधी डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताला खास गिफ्ट; 'या' क्षेत्रातील कंपन्यांना होणार फायदा

Narak Chaturdashi 2025 Zodiac Prediction: नरक चतुर्दशीच्या दिवशी कन्यासह 'या' दोन राशींचा सुरू होईल गोल्डन टाइम

Latest Marathi News Live Update : कोंढव्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने छापे, संशयितांना घेतलं ताब्यात

Pakistan Semi Final Scenario ODI WC : पाकिस्तानी संघावर टीम इंडियाच्या हाता पाया पडण्याची वेळ; तीन सामन्यांत उतरला सर्व माज...

SCROLL FOR NEXT