म्युकरमायकोसिस ई सकाळ
अहिल्यानगर

बापरे! नगरमध्ये म्युकरमायकोसिसचे 61 रुग्ण

आज संध्याकाळपर्यंत आणखी अहवाल येणार

अमित आवारी

नगर ः राज्यात कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांत म्युकरमायकोसिस आजार आढळून येत आहे. या आजाराचे 61 रुग्ण सध्या नगर शहरात उपचार घेत आहेत. या बाबत नगर शहर व तालुकानिहाय वर्गीकरणाचा अहवाल आज संध्याकाळपर्यंत हाती येणे अपेक्षित असल्याची माहिती, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

मधुमेह असलेल्या व कोरोनातून बऱ्या झालेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून येत आहेत. अशा रुग्णांवर उपचार करण्याचे आव्हान जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनासमोर ठाकले आहे.

अशा स्थितीत ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगर शहरातील विविध रुग्णालयांत 61 रुग्ण उपचार घेत असल्याचा अहवाल संबंधित रुग्णालयांकडून महापालिकेला काल सायंकाळपर्यंत प्राप्त झाला. या अहवालाचे वर्गीकरण आज होईल. त्यानंतरच तालुकानिहाय संख्या हाती येणार आहे.

कोव्हॅक्‍सिनचा दुसरा डोस

महापालिकेच्या आरोग्य केंद्रांबाहेरील फलकावर सोमवारी, "कोव्हिशिल्ड डोस उपलब्ध आहे. कोव्हॅक्‍सिनबाबत आठवडाभराने विचारणा करा,' अशा सूचना लिहिल्या होत्या. मात्र, महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना विचारले असता, आज (मंगळवारी) केवळ एक दिवसासाठी कोव्हॅक्‍सिनचा दुसरा डोस उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे, तसेच त्यासंदर्भातील यादी तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. कोव्हिशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सीन लसीचा पुरवठा अत्यल्प आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Stock Market Crash Today: काल तेजी, आज क्रॅश! शेअर बाजार अचानक का कोसळला? जाणून घ्या 5 मोठी कारणं

Ashok Kharat: भोंदू बाबाची 'स्पेशल २६ टीम'... बनावट छापे टाकण्यात अन् व्यापाऱ्यांना धमकावून जाळ्यात ओढण्यात माहिर

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

तरुणीच्या विनयभंग प्रकरणात अटक होईल, ५५ वर्षीय प्राचार्याला धमकावत ७ लाख उकळले; PSI, रिलस्टार महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा

दुनियादारी फेम अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी! सुरुवातीच्या काळात नायकाची भूमिका नाकारली, पण मालिकांनी बदललं आयुष्य

SCROLL FOR NEXT