70 tankers to quench the thirst of the people 
अहिल्यानगर

सव्वा लाख लोकांची तहान भागविण्यासाठी 70 टॅंकर !

सकाळ वृत्तसेवा

 नगर ः गावशिवारात टंचाई सावट दिवसेंदिवस वाढू लागले आहे. जिल्ह्यातील 60 गावे, 255 वाड्या-वस्त्यांवरील एक लाख 28 हजार 348 नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या 70 टॅंकरची धावाधाव सुरू आहे. 

गेल्या वर्षी पावसाने कहर केला. टॅंकरच्या आकड्याने गेल्या अठरा वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक करीत उच्चांकी आकडा गाठला होता. मागील वर्षी जिल्ह्यातील 572 गावे व तीन हजार 200 वाड्या-वस्त्यांवरील 13 लाख 49 हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे 827 टॅंकर धावत होते. यंदाच्या उन्हाळ्यात पाणी परिस्थिती चांगली राहिल्याने टॅंकरची मागणी उशिरा आली. यंदा एप्रिल महिन्याच्या सुरवातीला जिल्ह्यातील पठार भागातून टॅंकरचे प्रस्ताव येण्यास सुरवात झाली. 

सुरवातीला टॅंकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व्यस्तता लक्षात घेऊन सरकारने टॅंकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांकडे दिले. आजअखेर जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात शासकीय 20, तर खासगी 50 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 

तालुकानिहाय टॅंकर 
संगमनेर-09 
अकोले-02 
नेवासे-01 
नगर-10 
पारनेर-12 
पाथर्डी-02 
कर्जत-09 
जामखेड-19 
श्रीगोंदे-06 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT