82 thousand voters will exercise their voting right for the Gram Panchayat general elections 
अहिल्यानगर

Gram Panchayat Election : गावातील राजकारण तापले ; एकगठ्ठा मतदार वळविण्यावर विशेष जोर

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्‍यातील विविध ठिकाणच्या 26 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका शुक्रवारी (ता. 15) पार पडत आहे. 26 ग्रामपंचायतीमधील 266 सदस्यपदांसाठी सुमारे 82 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी स्थानिक प्रशासनासह पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. 

तालुक्‍यातील बेलापूर खुर्द, टाकळीभान, पढेगाव, वडाळा महादेव, खोकर, गोंडेगाव परिसरात निवडणुकीची रनधुमाळी सुरु आहे. प्रत्येक गावपुढारी आणि सर्वच उमेदवार प्रचार कामात व्यस्त आहे. अनेक महिला उमेदवारांचे पतींची प्रचारासाठी दमछाक होत आहे. सर्वाधिक मतदान मिळविण्यासाठी दिवसरात्र मतदारांच्या भेटीगाठी सुरु आहे. गावातील चौकासह विविध रस्त्यासमोर फलकबाजीचा जोर वाढत आहे. तालुक्‍यातील बेलापूरात येथे दोन नवले गटांमध्ये समोरासमोर थेट लढत होणार असून बेलापूरातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. तसेच टाकळीभान येथे समाजिक कार्यकर्ते कान्हा खंडागळे यांना मुरकुटे, ससाणे समर्थकांची साथ मिळाली असून त्यांची विखेपाटील समर्थक नानासाहेब पवार यांच्याशी समोरासमोर लढत सुरु आहे.

अनेक गावात विखे समर्थक आणि मुरकुटे समर्थक एकवटले असून तर काही गावामध्ये गटतटाचे राजकारण होणार आहे. कारेगाव येथे शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे आणि माजी सभापती दीपक पटारे यांच्या समर्थकांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. त्यासाठी दोन्ही गटाने उमेदवार मैदानात उतरविले आहे. प्रचारालाही चांगलाच वेग आल्याचे दिसते. खोकर, गोंडेगाव, वडाळा महादेव, एकलहरे, महांकाळवाडगाव, निपाणीवडगाव येथील राजकारण चांगलेच तापले आहे.

एकगठा मतदान मिळवण्यासाठी उमेदवारांकडून विशेष प्रयत्न सुरु आहे. गावातील रखडलेले कामे आणि ग्रामीण भागातील रस्त्याची दुरावस्था प्रचाराचा विषय बनला आहे. निवडणुकीत विजय होणे अनेक गावातील सत्ताधारी गटांसमोर मोठे आव्हान बनले आहे. विविध कामानिमित्त गावाबाहेर गेलेले मतदार मतदानाला गावी आणण्याचे नियोजन सुरु आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT