कोविड सेंटर गुगल
अहिल्यानगर

शुगर ७८०, स्कोअर १८ : कर्नाटकातून भाळवणीत आलेला वृद्ध ठणठणीत

केशव चेमटे

भाळवणी : कर्नाटक राज्यातील शिरढोण येथील 65 वर्षीय आजोबांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय तपासणी अंती 780 शुगर, स्कोअर 18 असतानाही 31 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात उपचारासाठी दाखल करून घेतले.

12 दिवसांच्या उपचारानंतर आंबाजी विठोबा कारंडे (वय 65, रा. शिराढोण, तालुका परचड, कर्नाटक) यांनी कोरोनावर मात केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे व आमदार लंके यांच्या मानसिक आधारामुळे मी बरा झाला असल्याची प्रतिक्रिया कारंडे यांनी व्यक्त केली आहे.(A corona patient from Karnataka was cured at the covid Center in Bhalwani)

शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात राज्याबरोबरच आता परराज्यातील रुग्णांनाही आ. नीलेश लंके यांचा आधार वाटू लागला आहे. आ. लंके यांच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरात हजारो रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतल्याची माहिती सोशल मीडियावर पाहिली. त्यानंतर भाळवणी येथे दाखल करण्यात आले. कर्नाटक राज्यातील 65 वर्षीय आंबाजी विठोबा कारंडे या रुग्णाने सामान्य उपचारानंतर कोरोनावर यशस्वी मात केली.

आ. लंके यांच्या रूपाने आम्हाला देव भेटल्याच्या भावना आंबाजी कारंडे यांचा मुलगा अर्जुन यांनी व्यक्त केली.अर्जुन कारंडे यांनी खाजगी वाहनातून थेट भाळवणी येथे वाडिलांना उपचारासाठी आणले. त्यावेळी त्यांना धड चालता येत नव्हते ना बोलता येत होते. रक्तातील साखरेचे प्रमाण 780, तर एचआरसीटी स्कोअर १८ होता. अतिशय गंभीर स्थिती असलेल्या या रुग्णास दाखल करून उपचार सुरू करण्याच्या सूचना आ. लंके यांनी दिल्या. डॉक्टरांच्या चमूने उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती सुधारू लागली.

नीलेश लंकेदेखील गहिवरले

रक्तातील साखर वाढून एचआरसीटी स्कोअरही वाढलेला. चालता, बोलताही येईना. अशा गंभीर स्थितीत दाखल केलेल्या आंबाजी यांची प्रकृती अवघ्या दोन दिवसांत सुधारली. ते बोलू, चालू लागले. आठ दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या शरीरातील प्राणवायूची पातळी 99 वर जावून सामान्य झाली. साक्षात मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडल्याची भावना व्यक्त करताना आंबाजी यांनी आ. लंके यांच्यासमोर हात जोडून आश्रूंना वाट मोकळी करून दिली. 65 वर्षीय वृद्धाने व्यक्त केलेली ही कृतज्ञता पाहून आ. लंके यांनाही गहिवरून आले.(A corona patient from Karnataka was cured at the covid Center in Bhalwani)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Tank Tower: मोठी घटना! नागपुरात पाण्याच्या टाकीचा टॉवर कोसळला; ३ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Latest Marathi News Live Update : पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का; माजी नगरसेवक विशाल तांबे यांचा राजकारणातून संन्यास

भारताची जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळला; फोटो, व्हिडीओ व्हायरल होताच पाकड्यांचा संताप, खेळाडूवर कठोर कारवाई

Kolhapur Election : ‘विजयी होणाऱ्यालाच तिकीट!’ शिवसेना शिंदे गटाचा ठाम निर्णय; महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली

१०० कोटींचा सिनेमा, अभिनयात दिली जिनिलियाला टक्कर, आता 'वेड' फेम अभिनेत्रीला मिळत नाहीये काम, म्हणते- दुसरा पर्याय...

SCROLL FOR NEXT