अहमदनगर

"सायकल रॅली ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चांगला उपक्रम"

सकाऴ वृत्तसेवा

पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असल्याचे सांगत सर्व सायकलस्वारांचे आभार जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी राळेगणसिद्धीत सायकल रॅलीच्या समारोपावेळी व्यक्त केले.

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : एकीकडे पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना आज देशभरातील सायकलस्वारांनी व कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅलीचे केलेले आयोजन राज्यासाठी व देशासाठी खूप महत्त्वाचे आहे. आज पेट्रोल, डिझेल, कोळसा, रॉकेल यांच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत असून त्याचे अनेक नैसर्गिक संकटात रूपांतर होत आहे. ते पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असल्याचे सांगत सर्व सायकलस्वारांचे आभार जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी राळेगणसिद्धीत सायकल रॅलीच्या समारोपावेळी व्यक्त केले. (a cycle rally was held at ralegan siddhi on the occasion of the birthday of senior social activist annasaheb hazare)

जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी परिवाराने 'अभिवादन सायकल रॅली' आयोजित केली होती. या रॅलीमध्ये देशभरातून विविध ठिकाणच्या १२५०० सायकलस्वारांनी सहभाग घेत तब्बल २५०००० किमी एवढे अंतर सायकलिंग करत हजारे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. हजारे यांचे देशभर कार्यकर्ते व चाहते असल्याने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना ही अनोखी भेट मिळाली. यावेळी सायकल रॅली पारनेर येथे पोहचल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे यांनी सर्वांचे स्वागत करत सर्वांना चहा व नाश्त्या दिला. यावेळी पारनेर पोलिसांनी सायकल रॅलीस सहकार्य केले.

या 'अभिवादन सायकल रॅली' मध्ये सुरेश पठारे, दादा लक्ष्मण पठारे, कमल पंत, एकनाथ भालेकर, लाभेष औटी, दादा महादू पठारे, सुनिल हजारे, शामराव पठाडे, विनोद गोळे, शंकर नगरे, उदय शेरकर, गणेश भापकर, आकाश पठारे, सुशांतराजे देशमुख, स्वप्निल मापारी, अक्षय जाधव, नाना आवारी, हनुमंत पठारे, भूषण गाजरे, स्वप्निल पठारे, यश पठारे, सुशांत शिंदे आणि प्रणव गाजरे आदी सायकलस्वारांनी सहभाग घेत तब्बल ३७ किमीचा प्रवास करत अण्णांना वाढदिवसाची भेट दिली.

यावेळी रॅलीमध्ये 'पाणी आडवा, पाणी जिरवा, सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा' अशा घोषणांचा जयघोष संपूर्ण रॅलीमध्ये केला.

सरपंच डॉ. धनंजय पोटे, माजी सरपंच जयसिंग मापारी, डॉ. गणेश पोटे, पंकज तिकोणे, गणेश भोसले, शरद मापारी, डॉ. राहुल पोटे, सदाशिव पठारे आदींनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली.

अण्णांचा तरुणांना सल्ला

वडापाव, मिसळ, पावभाजी, बर्गर, पिज्जा यांसारखे फास्टफूड असलेले पदार्थ शरीराला हानिकारक असतात. त्यामुळे ते खाऊ नयेत. त्याऐवजी मोड आलेले कडधान्य, काजू बदाम, दूध असे पदार्थ खावेत. यातून शरीराची झालेली झीज भरून निघते.

यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे म्हणाले, सायकल रॅली ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चांगला उपक्रम आहे. यात पेट्रोल, डिझेल, रॉकेल, कोळसा यांचा वापर होत नसल्याने पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत सुंदर उपक्रम असून यात व्यायाम पण होतो. त्यामुळे शरीर चांगले व निरोगी राहण्यास मदत होते. अशा उपक्रमांना माझा कायम पाठिंबा असेल. (a cycle rally was held at ralegan siddhi on the occasion of the birthday of senior social activist annasaheb hazare)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajkot TRP Game Zone Fire: सौराष्ट्रातील सर्वात मोठा गेम झोन 'डेथ झोन' कसा बनला? 2 एकरमध्ये पसरलेले, 20 हून अधिक खेळले जायचे

Railway News: मध्य रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक; ६९ मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द!

Cyclone Remal: 'रेमल' घेऊन येत आहे विनाश! जाणून घ्या कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल, मुसळधार पाऊस अन् वादळाचा इशारा...

Eng vs Pak : आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडपुढेही पाकिस्तान नतमस्तक; बटलरच्या संघाने बाबरच्या टीमला आणले रडकुंडी

T20 World Cup 2024 : कोहली-पांड्या टीम इंडियासोबत का गेले नाहीत अमेरिकेला? मोठे कारण आले समोर

SCROLL FOR NEXT