कोरोना 
अहिल्यानगर

जुलैमध्ये कोरोनाची तिसरी लाट, जिल्हाधिकाऱ्यांनी केले सावधान

अशोक निंबाळकर

नगर ः कोरोनाची तिसरी लाट जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जात आहे. त्याचबरोबर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प व अतिरिक्त पन्नास बेडस्‌ व्यवस्था कऱण्याचे काम सुरु आहे. हे काम गतीने पूर्ण करण्याच्या निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. (A third wave of corona is expected in July)

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोरोना उपाययोजना संदर्भात दूरदृश्‍यप्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, पल्लवी निर्मळ, रोहिणी नऱ्हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे यांच्यासह तालुका स्तरावरील महसूल, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे उपस्थित होते. (A third wave of corona is expected in July)

त्याचबरोबर, खासगी रुग्णालयांनीही त्यांच्या क्षमतेप्रमाणे अशा ऑक्सिजन प्रकल्प उभारणी करावी अथवा द्रवरुप ऑक्‍सीजन साठवणूक टाक्‍यांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

भोसले म्हणाले की, पहिल्या लाटेत पेक्षा दुसऱ्या लाटेत कमी कालावधीत रुग्णसंख्या अधिक वेगाने वाढल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या लाटेत हा वेग अधिक असण्याची शक्‍यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. अडीच महिन्यात चार लाख रुग्ण वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यामुळे त्याचा सामना करण्यासाठी आपण दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन पायाभूत आरोग्य सेवा बळकटीकरणाकडे अधिक लक्ष देणे आवश्‍यक आहे. दुसऱ्या लाटेच्या वेळेस आपल्याला ऑक्‍सिजन तुटवडा जाणवला.

तिसऱ्या लाटेत तो जाणवू नये तसेच जिल्ह्यासाठी आवश्‍यक ऑक्‍सिजन जिल्ह्यातच निर्माण व्हावा, यासाठी आपण ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी प्रत्येक ग्रामीण रुग्णालय परिसरात करीत आहोत. यासंदर्भात आवश्‍यक कार्यवाही सर्व यंत्रणांनी सुरू केली असली तरी अधिक गतीने काम करुन तो प्रकल्प लवकरात- लवकर उभारणी होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(A third wave of corona is expected in July)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: ₹15 हजारांचे होऊ शकतात ₹20 हजार! 33% GMP सह 631 कोटींचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

फक्त एका ट्रिकने Instagram हॅक! Meta AI मधील त्रुटीचा गैरवापर; लाखो अकाउंट्सवर हॅकर्सचा हल्ला, सुरक्षेसाठी लगेच करा 'हे' काम

सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SCROLL FOR NEXT