Accident is not an accident of a person in Pachunda 
अहिल्यानगर

पाचुंद्यातील व्यक्तीचा अपघात नव्हे घातपात

सुनील गर्जे

नेवासे : दुचाकी अपघातात जखमी झाल्याचे सांगण्यात आलेल्या जखमीचा आज पुणे येथे ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मात्र, त्याच्या सासूरवाडीच्या नातेवाइकांनी "हा अपघाती मृत्यू नसून त्याच्या घरच्यांनीच खून केला आहे,' असा आरोप केल्याने पोलिसांनी त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनीही तसाच संशय व्यक्त केला आहे. 

रामदास लक्ष्मण खरात (वय 32, रा. खरात वस्ती, पाचुंदे, ता. नेवासे) असे मृताचे नाव आहे. रामदास पत्नी व दोन मुलांसह पाचुंदे येथे खरात वस्तीवर आई-वडील, भाऊ, भावजय यांच्या समवेत एकत्र राहत होता.

सोमवारी (ता. 6) रात्री दुचाकी अपघातात जखमी झाल्याचे सांगून वडील व भावाने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी रुग्णालयाकडून कुकाणे पोलिसांना कळविण्यात आले. मात्र, रामदासची प्रकृती चिंताजनक असल्याने तो जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितल्याने पोलिसांना जबाब घेता आला नाही.

दरम्यान, गुरुवारी (ता. 9) प्रकृती गंभीर झाल्याने रामदासला ससून रुग्णालयात हलविले. तेथे आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाने कळविल्यानंतर नेवासे पोलिसांनी जाऊन सायंकाळी साडेसात वाजता मृतदेह ताब्यात घेतला. 

रामदासच्या सासरवाडीच्या नातेवाइकांनी त्याचा अपघात झाला नसून घरच्यांच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. ही सर्व मंडळी माहिती मिळताच पाचुंदे येथे आल्याने येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

पोलिस सूत्रांनी सांगितले, की रामदासला दारूचे व्यसन होते. तो दररोज दारू पिऊन घरातील सर्वांना त्रास देत असे, म्हणून घरच्यांनीच त्याला अद्दल घडविण्यासाठी मारहाण केली; मात्र मार वर्मी लागल्याने तो बेशुद्ध झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला, असा संशय आहे. 

पाचुंदे प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. संबंधिताने अपघात झाल्याचे कारण दाखवून जखमीला दवाखान्यात नेले. मात्र, हा प्रकार संशयास्पद आहे. चौकशी काही बाबी समोर आल्यास खुनाचा गुन्हा दाखल करू.

मंदार जवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, शेवगाव.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Muncipal Election : काँग्रेसची मते वाढली, भाजपचा हिट रेशो वाढला; महापालिकेचं राजकीय गणित उघड

Latest Marathi News Live Update : सोलर लावून देतो सांगून शेकडो ग्राहकांची फसवणूक, अमरावतीतील धक्कादायक घटना

Gastrointestinal Cancer : वारंवार पोट दुखतंय? मग, याकडे अजिबात दुर्लक्ष नको; असू शकते कॅन्सरची सुरुवात...

Sugarcane Trolley Overturned : वाणेवाडीत ट्रॉलीभर ऊस अंगावर पडूनही बाप-लेक सुखरूप

Nashik Farmers Protest : वनहक्कासाठी आदिवासींचा एल्गार; नाशिक-गुजरात महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी ठप्प!

SCROLL FOR NEXT