accident while returning from devadarshan rohit pawar finance assistance to 15 women admitted in hospital rashin  Sakal
अहिल्यानगर

Rashin Accident : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; १५ महिला रुग्णालयात दाखल, रोहित पवारांनी केली मदत

Ahmednagar Latest News : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सर्वच्या सर्व महिला गंभीर जखमी झाल्या.

सकाळ वृत्तसेवा

राशीन : देवदर्शनाहून घरी परतताना वाहनाला भीषण अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या बारडगाव सुद्रिक येथील सामान्य कुटुंबातील १५ महिलांच्या मदतीला देवदूत बनून आमदार रोहित पवार धावल्याने त्यांना तत्काळ मदत, तर मिळालीच. शिवाय रुग्णालयातील औषधोपचाराचा खर्चही आमदार पवारांनी उचलल्याने मृत्यूच्या दाढेत गेलेल्या या महिला सुखरूप आहेत.

नुकतेच मांदळी येथे देवदर्शनासाठी बारडगाव सुद्रिक (ता. कर्जत) येथील महिला पिकअप जीपमधून जात असताना भोसे-खांडवीच्या दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सर्वच्या सर्व महिला गंभीर जखमी झाल्या.

वाहन उलटल्याने कोणाच्या डोक्याला, तोंडाला, मणक्याला, हाताला, पायाला प्रचंड मार लागून या महिला रक्तबंबाळ झाल्या होत्या. घटना घडताच कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या कानावर हा प्रकार घातला. अन् आमदार पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या यंत्रणेमार्फत सर्व जखमी महिलांना रुग्णवाहिकेतून श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर या सर्व महिलांच्या उपचाराचा खर्च आपण करणार असल्याचे आमदार पवार यांनी फोनवरून संबंधित डॉक्टरांना सांगितले. या गोष्टीची माहिती जखमी महिलांना नसल्याने आपल्या उपचाराच्या खर्चाचे काय हा प्रश्‍न बहुतांश महिलांना भेडसावत होता; मात्र तुमच्या उपचाराचा खर्च आमदार पवार करणार असल्याचे डॉक्टरांनी सांगताच जखमी महिलांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

बारडगाव सुद्रिककरांतर्फे आमदार रोहित पवार यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. सर्वसामान्यांची काळजी घेणारा आमदार आम्हाला मिळाला आहे.

- गणेश सुद्रिक, कार्याध्यक्ष, शरदचंद्र पवार पक्ष, कर्जत

रोहित पवार देवासारखे आमच्या मदतीला धावून आले. त्यांच्यामुळे आज आम्ही मरणाच्या दारातून परत आलोत.

-जयश्री सुद्रिक

उपचारादरम्यान काळजी वाटत होती कुठून आता एवढे बिल भरायचे; परंतु देवदूत होऊन रोहितदादा आमच्या मदतीला धावून आले. गरिबांचा आशीर्वाद त्यांच्या कायम पाठीशी राहील.

-रुपाली गावडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT