अहिल्यानगर

श्रीगोंदा बाजार समितीत संचालक बळ आजमावणार

संजय आ. काटे

श्रीगोंदे : बाजार समितीच्या सभापतींचा राजीनामा, उपसभापतींवर अविश्वास ठराव व परस्पर पगारवाढीमुळे अडचणीत आलेले सचिव, अशा घटनांमुळे महिनाभर समितीचा कारभार चर्चेत होता.

आता शुक्रवारी (ता. 24) मासिक सभा होऊ नये, यासाठी झालेले प्रयत्न निष्फळ ठरले. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी कोविड-19चे नियम पाळून सभा घेण्यास मंजुरी दिली. त्यात सचिव दिलीप डेबरे यांच्याबाबत संचालक मंडळ काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

राजकारण, लिंबूदर व व्यापाऱ्यांचे निलंबन, यामुळे बाजार समिती चर्चेत राहिली. सह्यांचे अधिकार नसलेले सभापती धनसिंग भोईटे यांनी राजीनामा देत खळबळ उडवून दिली. नंतर लगेच 18पैकी 12 संचालकांनी एकत्र येत, उपसभापती वैभव पाचपुते यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. त्यात भर पडली ती सचिवांची.

संचालक मंडळ व सहकार खात्याला अंधारात ठेवून डेबरे यांनी त्यांचा पगार परस्पर वाढवून घेतल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर थेट कारवाई करा, अन्यथा संचालक मंडळ बरखास्त होईल, असा फतवा निघाल्याने सगळा गोंधळ एकदाच समोर आला. 

संचालक मंडळाची मासिक बैठक टाळण्यासाठी विरोधी संचालकांनी प्रयत्न केल्याची माहिती आहे. काही नेत्यांनी त्यात हस्तक्षेप करीत, कोरोनामुळे सभा घेऊ नये, असेही अधिकाऱ्यांना सुचविले. मात्र, जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी कोरोनाचे सगळे नियम पाळून सभा घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे शुक्रवारच्या सभेकडे लक्ष लागले आहे. 

 
बाजार समितीची शुक्रवारची सभा कोरोनाचे नियम पाळून होईल. तीत सचिवांवर कारवाईसाठी समविचारी संचालक ठाम आहेत. संस्था महत्त्वाची आहे. व्यक्ती कोणीही असो; तेथे माघार नाही. 
- बाळासाहेब नाहाटा, ज्येष्ठ संचालक, बाजार समिती 

 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

SCROLL FOR NEXT