This action is being taken against those who are hiding from the district - Prajakta Tanpure 
अहिल्यानगर

परजिल्ह्यातून चोरून-लपून येणाऱ्यांवर ही कारवाई - प्राजक्त तनपुरे

सकाळ वृत्तसेवा

नगर ः ""जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यात मुंबई-पुणे कनेक्‍शन मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे परजिल्ह्यांतून येणाऱ्या व्यक्तींची तत्काळ माहिती कंट्रोल रूमला दिली पाहिजे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीची काटेकोर अंमलबजावणी करा, परजिल्ह्यांतून येणारी कोणतीही व्यक्ती सुटता कामा नये, जिल्ह्यात कोणी चोरून-लपून येत असेल, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा,'' अशा सूचना नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीनंतर तनपुरे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ""निसर्ग चक्रीवादळ संगमनेर, अकोले, कोपरगाव सीमेवरून नाशिककडे जाणार आहे. मात्र, आवश्‍यकता असेल त्या ठिकाणी तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. वादळामुळे विजेच्या तारा, खांब पडल्यास तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे आदी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांना लवकरच दिलासा 
अंतिम परीक्षेबाबत सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय घेतला होता. अनिश्‍चित काळासाठी परीक्षा लांबविल्या, तर विद्यार्थ्यांची हातची नोकरी जाण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी कायदेशीर मार्ग काढून विद्यार्थ्यांना लवकरच दिलासा दिला जाईल, असे आश्‍वासन तनपुरे यांनी दिले. 

ऑनलाइन क्‍लास घेताना ब्रेक आवश्‍यक 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बहुतांश शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाइन वर्ग घेण्याला पसंती दिली. मात्र, हे ऑनलाइन क्‍लास घेताना त्याला 45 मिनिटांच्या कालावधीनंतर ब्रेक देणे गरजेचे आहे. मात्र, या संदर्भात ऑनलाइन क्‍लास घेणाऱ्या संस्था, शाळा, महाविद्यालयांकडून तसे होताना दिसत नाही. सर्रास दोन-दोन तास क्‍लास घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ऑनलाइन क्‍लास घेताना ब्रेक दिलाच पाहिजे. तशा सूचनाही संबंधितांना देण्यात येणार आहेत, असे तनपुरे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT