ST sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : ११८ कर्मचाऱ्यांना संप भोवला

जिल्ह्यात आजअखेर एसटीतील २९० जणांचे निलंबन

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : गेल्या पावणेतीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा ठप्प झाली आहे. एसटी(ST) प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने आता कारवाई (Action)करण्यास सुरवात झाली आहे. सुरवातीला निलंबनाची (suspension)कारवाई करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने, बडतर्फीची कारवाई आता प्रशासनाने सुरू केलेली आहे. असे असतानाही कर्मचारी संपावर अद्यापही ठाम आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सध्या जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही बसस्थानकांमध्ये खासगी वाहने प्रवासी घेत आहेत. त्याचा फटका आगामी काळात एसटीला बसणार आहे. संपामुळे एसटीच्या अहमदनगर विभागाला सुमारे ४५ कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.जिल्ह्यात सध्या एसटीचे एकूण तीन हजार ७४३ कर्मचारी आहेत. त्यांतील एक हजार १०८ कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत. ११० कर्मचारी आठवडाभर सुट्टीवर होते. १८२ कर्मचारी रजेवर आहेत. ३४ कर्मचारी इतर आगारांत कर्तव्यावर आहेत. ८० कर्मचारी निलंबित आहेत. २२२९ कर्मचारी गैरहजर आहेत.

एसटी प्रशासनाने आता कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरवात केलेली आहे. आजअखेर एकूण २९० जण निलंबित झालेले आहेत. ११८ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाई मोहिमेमुळे कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतलेली आहे. गेल्या पावणेतीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्या, तरी प्रवाशांचेही हित कर्मचाऱ्यांनी पाहणे गरजेचे आहे. या संपामुळे खासगी वाहतूकदारांनी सर्वसामान्यांची लूट केलेली आहे. मात्र, आता ही लूट त्यांच्याकडून थांबली असून, नियमित भाडेआकारणी सुरू केलेली आहे.

बडतर्फ झालेले कर्मचारी

तारकपूर आगार १५, जामखेड सात, श्रीरामपूर आठ, कोपरगाव नऊ, संगमनेर १९, श्रीगोंदे ११, पारनेर सहा, नेवासे १३, पाथर्डी १८, नगर कार्यशाळा चार, श्रीरामपूर कार्यशाळा दोन.

कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली

मागण्याही मान्य होईनात अन् संपही मागे घेता येईना. यातच आमची आर्थिक परिस्थिती आता खालावत चालली आहे. त्यामुळे यावर आता एसटीच्या नेत्यांसह एसटी प्रशासन व राज्य सरकारने एकत्र बसून ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT