Activists said to MLA Lahamate, we are in NCP 
अहिल्यानगर

पिंपळगाव खांडच्या जलपुजनात निघाली उणीदुणी...लहामटेंना कार्यकर्ते म्हणाले, लय हवेत जाऊ नका

शांताराम काळे

अकोले : मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणातील पाण्याचे तिसऱ्यांदा पूजन झाले. माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यानंतर आज तिसऱ्यांदा जलपूजन झाले. त्यातून अकोल्यातील राजकारणाचे तिसरे नाट्य पाहायला मिळाले. 

पिंपळगाव खांड धरणावर आज सकाळी 11 वाजता शेतकरी, वारकरी, धरणग्रस्त व लाभधारकांकडून जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे, "अगस्ती'चे संचालक मीनानाथ पांडे यांनी वेगळ्याच राजकीय नाट्याची सुरवात केली.

देशमुख व पांडे यांनी भाषणांतून, "आम्ही राष्ट्रवादी'तच आहोत, असा सूर आळवला, तर दराडे यांनी आमदार लहामटे यांना खडे बोल सुनावले. "पिंपळगाव खांड धरणाचे जलपूजन करताना, ठरावीक चार कार्यकर्त्यांना सोबत आणले. मित्रपक्षाला विश्वासात न घेता जलपूजन केले. जमिनीवर पाय असू द्या, हवेत जाऊ नका..' असा सल्ला दिला. 

रमेश देशमुख यांनी राजकीय नाराजी व्यक्त केली. पांडे यांनी आपण राष्ट्रवादीतच असल्याचे सांगत, "धरणाच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, मागील दोन्ही जलपूजन कार्यक्रमात निमंत्रण दिले नाही,' अशी खंत व्यक्त केली. विश्वनाथ महाराज शेटे, दीपक महाराज देशमुख, किरण महाराज शेटे, अरुण महाराज भोर, रमेश महाराज भोर, सोमनाथ महाराज गोडसे आदी उपस्थित होते. या राजकीय नाराजीनाट्यात वारकऱ्यांची मात्र चांगलीच गोची झाली. 

"आम्ही केवळ पिंपळगाव खांड धरणातील पाणी पाहण्यासाठी गेलो असताना, तेथे जलपूजन केले. त्यानंतर राजकीय भाषण व टीकेशी आमचा काहीही संबंध नाही,' असा खुलासा दीपक महाराज देशमुख यांनी केला. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT