The administration has decided to work in the presence of 50 per cent staff in the Zilla Parishad 
अहिल्यानगर

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार 50 टक्के; प्रशासनाने घेतला निर्णय

संजय काटे

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधक उपाययोजना काटेकोरपणे लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे पालन करीत जिल्हा परिषदेत 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

श्रीगोंद्यातील कारखान्यांचे 16 लाख टन ऊस गाळप; नागवडे, कुकडी कारखान्यांना कमी क्षमतेच्या 'साजन शुगर'ची टक्कर
 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कडक केल्या आहेत. तसा अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशामुळेच जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. 15) केली जाणार आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत 31 मार्चपर्यंत कामकाज सुरू राहणार आहे. 

दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्हा परिषदेतील कामकाज 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

तीन कर्मचारी आढळले बाधित
 
लोकसेवा आयोगाची परीक्षा 21 मार्चला होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परीक्षेअगोदर परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत जिल्हा परिषदेतील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ; व्यापारी बँकांकडून जादा व्याज आकारणीचा संशय, ५.५ लाख खाती ऑडिटच्या कक्षेत

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

SCROLL FOR NEXT