After accepting the Padma Shri award Popatrao Pawar went to meet Anna Hazare  Sakal
अहिल्यानगर

पद्मश्री पुरस्कार स्वीकारताच पोपटराव पवार अण्णांच्या भेटीला

एकनाथ भालेकर


राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) :
सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे हिवरेबाजार गावाने आजपर्यंत केलेल्या कामाची पावती आहे. त्यांनी दिल्ली येथे सर्व गावकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पुरस्कार स्वीकारला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पवारांसह सर्व गावकऱ्यांचेही अभिनंदन केले.

हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पवार यांनी सपत्नीक राळेगणसिद्धी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. हजारे म्हणाले, की लवकरच पोपटराव पवारांना पद्मभूषण पुरस्कार मिळावा. पद्म पुरस्कारामुळे गावाला, समाजाला, देशाला एक नवी प्रेरणा मिळते. अहमदनगर जिल्ह्याला दोन पद्मश्री, तर राजस्थान येथील सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर पालीवाल यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार नीलेश लंके, उद्योजक दादा पठारे, अशोक सावंत, सरपंच लाभेश औटी, माजी सरपंच जयसिंग मापारी, मंगल मापारी, शरद मापारी, दिलीप देशमुख, विमल ठाणगे, श्यामराव पठाडे, पत्रकार मार्तंड बुचडे, सुनील हजारे, दत्ता आवारी, नाना आवारी, अन्सार शेख यांच्यासह राळेगणसिद्धी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोपटराव पवार, सरपंच लाभेश औटी, जयसिंग मापारी, शरद मापारी आदींनी मनोगत व्यक्त केले.

राहीबाई पोपेरे यांनी बीजसंवर्धनाचे काम हाती घेऊन, त्या कामात जीव तोडून त्यांनी लक्ष केंद्रित केले. हायब्रिड बियाण्यामुळे आपले आयुष्य कमी होत आहे. त्यामुळे राहीबाईंनी देशी वाण व बियाण्यांचे केलेले जतन खूप महत्त्वाचे आहे, असे अण्णा म्हणाले.

पोपटराव पवार यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार म्हणजे गेल्या ३० वर्षांत गावकऱ्यांनी केलेले परिश्रम व मेहनतीची सरकारकडून मिळालेली पावती आहे. त्यांनी दिल्ली येथे तुमचे प्रतिनिधी म्हणून पुरस्कार स्वीकारला आहे.
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक, राळेगणसिद्धी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Arunachal Pradesh and China : ‘’अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न अन् अविभाज्य भाग’’ ; भारताने चीनला कडक शब्दांत सुनावलं!

Suryakumar Yadav Prediction : ‘T20 World Cup 2026’चं शेड्यूल जाहीर होताच, कॅप्टन सूर्याने थेट फायनल मॅचबाबत केलं भाकीत!

Supriya Sule: बिनविरोध निवडणुकांवर सुप्रिया सुळेंचा 'आक्षेप'; राज्य निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

Pune University :पुणे विद्यापीठात बिबट्या वावराच्या चर्चा; सूर्यास्तानंतर बाहेर पडू नका; विद्यापीठाचे आवाहन!

Mumbai Crime: पाच वर्षांच्या चिमुकलीचा ५० हजारांत सौदा! मुंबईतल्या वाकोला पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT