After denying permission in Delhi, Anna is going to start a hunger strike in Ralegan Siddhi 
अहिल्यानगर

दिल्लीत परवानगी नाकारल्याने अण्णांचे राळेगणसिद्धीत उपोषण

एकनाथ भालेकर

राळेगण सिद्धी (अहमदनगर) : कॉंग्रेसचे सरकार असताना दिल्लीत मी उपोषण केले, तेव्हा माझ्या आंदोलनाचे कौतुक करीत होते. आता शेतक-यांच्या प्रश्नांबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही, त्याचे उत्तरही दिले जात नाही. आंदोलनाला रामलिला मैदानाला नाकारले जाते. त्यामुळे भाजप नेत्यांचे शेतक-यांच्या भूमिकेचे व कौतुकाचे व्हिडीओ असलेली सीडी तयार करून जनतेला दाखविणार असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. लावा रे तो व्हिडीओच्या माध्यमातून अण्णा जनजागृती सुरू करणार आहेत.

स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालाला हमीभाव मिळावा, केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला स्वायतत्ता मिळावी, अशा मागण्यांसाठी हजारे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून ( ता. ३० जानेवारी ) राळेगण सिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात शेवटचे प्राणांतिक उपोषण आंदोलन सुरू करणार आहेत.

हजारे म्हणाले, सन २०११ च्या रामलिला मैदानावरील आंदोलनात पंतप्रधानांपासून अनेक माझ्या आंदोलनाचे गुणगान गात होते. आता शेतक-यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्याकडून एकाही पत्राचे उत्तर अजूनही दिले नाही.  शेतक-यांच्या प्रश्नांसाठी नवी दिल्लीतील रामलिला मैदानावर आंदोलनासाठी चार वेळा पत्रव्यवहार केला, तरीही परवानगी नाकारली. शेतक-यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारला चिंता नसून खोटी आश्वासने देऊन ते शेतक-यांची फसवणूक करीत आहेत.

यांचे आहेत ते व्हिडीओ

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकपाल आंदोलनासह व अण्णा हजारे यांच्या कार्याचे कौतुक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सीतारमण, रविशंकर प्रसाद यांच्यासह नऊ प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रियांचे व्हिडीओ असून ते सोशल मिडीयावर पाठविले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs JPN : मोठा वाद! श्रेयस अय्यर भांडला, अम्पायरने निर्णय बदलला; तसं नसतं झालं तर जिंकला असता जपान, नेमकं काय घडलं ?

आता फक्त Call-SMSचा प्लान, कंपन्यांना बंधनकारक; रिचार्ज होणार स्वस्त, TRAIचा मोठा निर्णय

Mark Wood Retirement: दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; ३६ व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

दुष्काळाची अधिसूचना शनिवारपर्यंत, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT