Allegations in teacher bank 
अहिल्यानगर

अडीच महिन्यांनी पुन्हा कांद्याचे लिलाव झाले सुरू

सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे नेप्ती उपबाजार समितीतील हमाल-माथाडींसह सर्वांचे आरोग्य चांगले रहावे, या हेतून कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते. अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा लिलाव सुरु करण्यात आले. आज (गुरुवारी) एकूण 25 हजार गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला एक हजाराच्या पुढे भाव मिळाला. 

कोरोना विषाणूचा उद्योग व्यवसायांना मोठ्या प्रमाणात फटका बसला तसचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. लॉकडाउनच्या काळात नेप्ती उपबाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद ठेवल्याने गावरान कांदा निघूनही शेतकऱ्यांना विकता आला नाही. त्यामुळे अनेकांना भाडोत्री चाळी घेऊन त्यामध्ये कांद्याची साठवणूक करावी लागली.

ज्यांना कांद्याची चाळ मिळाली नाही त्यांचा कांदा अवकाळी पावसाच्या तडाख्यात भिजल्याने प्रतवारी ढासळली आहे. कांद्याचे आणखी नुकसान होऊ नये, म्हणून लिलाव सुरू करण्याची मागणी होत होती. त्यामुळे कांद्याचे लिलाव सुरु केले आहेत. पहिल्याच दिवशी कांद्याच्या 25 हजार गोण्यांची आवक झाली असून एक नंबर कांद्याला 1050 रुपयांचा भाव मिळाला आहे. 

लॉकडाउनमुळे बाजारपेठेत शुकशुकाट आहे. त्यातच कांद्याचे लिलाव बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने उलाढाल आणखी मंदावली होती. आता लिलाव सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा आल्यानंतर बाजारपेठेतील उलाढाल वाढून कांद्यालाही चांगला भाव साधण्याची शक्‍यता आहे. 
- अशोक लाटे, अध्यक्ष, कांदा व्यापारी व आडतदार संघटना, नगर 

सरकारच्या सूचनांचे नेप्ती उपबाजारामध्ये तंतोतंत पालन करूनच कामकाज करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी कांद्याची 25 हजार कांदा गोण्यांची आवक झाली. आगामी काळातही आवक वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. 
- अभय भिसे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT