Agriculture officer insults agricultural assistant 
अहिल्यानगर

कृषी अधिकाऱ्याची कृषी सहायकाला शिवीगाळीने गदारोळ

आनंद गायकवाड

संगमनेर ः राहुरी तालुक्‍यातील कृषी अधिकारी महेंद्र ठोकळ यांनी कृषी सहायक संघटनेचे माजी राज्याध्यक्ष व विद्यमान राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ भास्कर यांना शिवीगाळ केली.

या घटनेचा निषेध करत येथील कृषी सहायक संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले. तसे निवेदन नुकतेच उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, की राहुरीचे तालुका कृषी अधिकारी ठोकळ यांनी अपमानास्पद वागणूक देत सोमनाथ बाचकर यांना धमकावल्याच्या प्रकार निषेधार्ह आहे. या असंस्कृत अधिकाऱ्याविरुद्ध त्वरित कारवाई करावी.

कृषी सहायक संघटनेच्या कार्याध्यक्षा नंदा नेहे, जिल्हा प्रतिनिधी सुरेश घोलप, नारायण घुले, शारू जाधव, अर्चना शिंदे, अनिता पांडे, अर्चना आंबरे, अर्चना नवले, रेहाना शेख, अपर्णा गडाख, राजू साबळे, योगेश शेंडे, हिरालाल सुर्वे, श्‍यामल तळोले, लक्ष्मण जुंधारे, ज्योती लांडगे, संकेत देशमुख, संगीता सातपुते, सुनीता गोसावी, शीतल जाधव, सुमीत गोसावी, दिलीप हारदे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकोल्यातील वांगरगावात तणाव; शिवरायांचा पुतळा हटविण्याचा वाद; नेमकं काय घडलं?

Jalgaon News : जळगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला युद्धाची झळ! कच्चा माल मिळेना, उत्पादन निम्म्यावर आल्याने उद्योजक चिंतेत

२३ वर्षे डावललं! ‘टॉस, प्रेझेंटेशनमधून मला बाजूला ठेवलं’; रवी शास्त्री याचं नाव घेऊन माजी खेळाडूचा संताप

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा खरातचे 100पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब

Ardhapur News : अर्धापूरात गारपीट-वादळी वाऱ्याचा तडाखा; ८ गावांतील २५० हेक्टर शेती बाधित, प्रशासनाची पाहणी

SCROLL FOR NEXT