Agriculture should be included in the curriculum from the very beginning
Agriculture should be included in the curriculum from the very beginning 
अहमदनगर

पहिलीपासून कृषी विषय अभ्यासक्रमात हवा, महात्मा फुले विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मत

रहेमान शेख

राहुरी विद्यापीठ : ""शेतकऱ्यांचा विकास, त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होण्यासाठी, तसेच शेती क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी कृषी शिक्षण सर्वांना मिळणे गरजेचे आहे.

आज अनेक शेतकरी विद्यापीठास भेटी देऊन नवनवीन संशोधनाबाबत माहिती घेताना दिसून येत आहेत. तसेच, विद्यार्थ्यांनाही कृषी विषयाबद्दलचे शिक्षण अनिवार्य आहे,'' असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक फरांदे यांनी केले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठात ऑनलाइन कृषी शिक्षण दिन साजरा झाला. त्या वेळी ते बोलत होते. सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. चिंतामणी देवकर, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे, जितेंद्र मेटकर उपस्थित होते.

डॉ. फरांदे म्हणाले, ""शेतकरी शिकला, विद्यापीठाने विकसित केलेले नवनवीन तंत्रज्ञान त्याने मिळविले, तर त्यांची प्रगती नक्कीच आहे. विद्यापीठाचे मुख्य ध्येय कृषी शिक्षण असून, सहा दशकांपासून विद्यापीठाचे कृषी शिक्षणाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. आजच्या युवकांचा कृषी शिक्षणाकडे ओढा वाढला आहे.

देशभरात 65 टक्के लोक शेती क्षेत्राशी निगडित व्यवसायांमध्ये आहेत. डॉ. रसाळ यांनी "कृषी शिक्षणानंतरच्या आमूलाग्र संधी' या विषयावर माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत काळे यांनी केले. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT