अहमदनगर:उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : उड्डाणपुलाचे सुशोभीकरण सुरू होणार

शिवचरित्र चित्रीकरणास आज प्रारंभ डॉ. विखे, आमदार जगताप यांची संकल्पना

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर: श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त येथील उड्डाणपुलाच्या शिवचरित्र चित्रिकरणाचा प्रारंभ उद्या (ता. ६) होत आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

येथील मार्केट यार्ड चौकात सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शहरातील उड्डाणपूल ही शहराची शान असणार आहे. त्यात अधिक सौंदर्याची भर घालण्यासाठी पुलावर सुंदर रंगकाम करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गंत शिवचरित्र रेखाटण्याचे नियोजन केले आहे. पुलाचे उद्घाटन होण्यापूर्वी हे काम होणार आहे. त्यामुळे हा पूल पर्यटकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. केवळ शिवचरित्रच नव्हे, तर आकर्षक वृक्ष तयार करण्यात येणार आहेत. ॲम्पी थिएटर, फुलांची आकर्षक झाडे लावून सुंदर रोषणाई करण्यात येईल. तसेच आवश्यक तेथे रंगीत कारंजे करण्याचे नियोजन आहे. यासाठी खासदार डॉ. विखे व आमदार जगताप यांची संकल्पना आहे.

६५ पिलर्सचे सुशोभीकरण

उड्डाणपुलासाठी ६५ पिलर्स आहेत. १९ रॅम्प आहेत. ९३१ सिग्मेंट आहेत. पुलाची लांबी तीन हजार ८० मीटर म्हणजेच तीन किलोमीटर आहे. डिसेंबर २०२० मध्ये पुलाच काम सुरू झालेे आहे. ते डिसेंबर २०२२ पर्यंत संपेल. जिल्ह्यातून येणाऱ्या ग्रामस्थांना या पुलाबाबत उत्सुकता वाटते. बाहेरील जिल्ह्यातून येणारे लोक हे भव्य-दिव्य काम थांबून पाहत आहेत. या पुलामुळे नगरला मोठ्या शहराचा लूक येत आहे. त्यात आता शिवचरित्रांतील विविध चित्रांची भर पडणार आहे.

पुलामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. पुलाच्या पिलर्सवर शिवचरित्रांतील विविध प्रसंग रेखाटण्यात येणार आहेत. त्यामुळे हा पूल पर्यटकांचे आकर्षण ठरेल. नगर शहरात भूईकोट किल्ला, जवळील चांदबीबी महाल तसेच उड्डाणपूल असे पर्यटकांचे आकर्षण असेल.

- संग्राम जगताप, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Report Card: भारतीय संघांनी वर्षभरात जिंकल्या तीन ICC ट्रॉफी; वनडे-टी२०मध्ये वर्चस्व, पण कसोटीत घोर निराशा

Vasai Virar News : नवं वर्ष जल्लोषाला यंदा तळीरामाची पंचाईत होणार; एकादशी मुळे बार बंद!

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीसाठी पुण्याची जबाबदारी असणार सुप्रिया सुळेंकडे!

Loni Kalbhor News : अवघ्या अर्ध्या तासात ५ एकर ऊस जळून खाक; लोणी काळभोरचे ६ शेतकऱ्यांचे १० लाखांपेक्षा अधिक नुकसान!

Mangalwedha Election : मंगळवेढा नगरपालिकेत क्रॉस मतदानाचा परिणाम; सुप्रिया जगतापचा पराभव; सुनंदा अवताडेला फायदा!

SCROLL FOR NEXT