Collector ahmednagar esakal
अहिल्यानगर

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः अपडेट केली कांदा पिकाची माहिती

आनंद गायकवाड


संगमनेर (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुक्यातील खांडगाव येथील बाबाजी बाळचंद गुंजाळ यांच्या शेतातील कांदा पिकाची माहिती स्वतः अॅपद्वारे अपडेट केली.

गावागावात शासनातर्फे जनजागृती

राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या इ-पीक पहाणी या महत्वाकांक्षी प्रकल्पाने चांगलाच वेग घेतला आहे. प्रथम संगमनेर तालुक्यात राबविलेला हा उपक्रम १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यभरात लागू करण्यात आला आहे. आपल्या शेतातील पिकाची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी आत्ता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहीली नाही.
राज्याच्या ग्रामीण भागातील जवळपास प्रत्येक कुटूंबाचा अविभाज्य घटक झालेल्या, मोबाईलवरील अॅपद्वारे ही प्रक्रिया अधीक सुलभतेने करता येण्याची व्यवस्था महसूल विभागाने केली आहे. यासाठी गावोगाव मोठ्या प्रमाणात जनजागृती कऱण्याचे काम महसूलचे कोतवाल, पोलिस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक व कृषी मंडळ अधिकारी करीत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सातबारा वाटप योजनेचा आढावा

तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आपल्या पथकासमवेत या कामाकाजाची प्रत्यक्ष पहाणी केली. या वेळी खांडगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील कांदा पिकाची नोंदणी त्यांनी स्वतः करुन या अॅपची उपयुक्तता जाणून घेतली. तसेच मोफत घरपोच सातबारा वाटप योजनेचा आढावा घेतला. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही नोंद केली नाही. त्यांनी नोंदणी प्रक्रिया करुन, लवकरात लवकर पिकपेरा अपडेट करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या वेळी तहसीलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, उप अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. नितीन सूर्यवंशी, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, मंडळ कृषी अधिकारी पंकज कव्हाड, तलाठी योगिता शिंदे - थोरात, कृषी सहायक अर्चना आंबरे, शेतकरी व या कामात मदत करणारे गावातील युवक उपस्थित होते.

''संगमनेर तालुक्यात या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत असून, तालुक्यातील सुमारे ७४ हजार शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत इ-पीक पहाणी अॅपवरील नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे.'' - अमोल निकम, तहसीलदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT