ahmednagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : श्रीगोंद्यात डेंगी वाढतोय; शहरातील यंत्रणा गाफील; रुग्ण वाढण्याची भीती

सध्याच्या माहितीनुसार डेंगीसदृश्य रुग्णांची संख्या वाढत आहे.

संजय काटे

श्रीगोंदे - पाऊस थांबल्यानंतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. तालुक्यासह शहरात डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. तथापि नगरपालिका व आरोग्य यंत्रणा हवी तेवढी दक्ष नसल्याचे जाणवत असल्याने वेळीच उपाययोजना केली नाही तर डेंगीची साथ फैलावण्याची भिती व्यक्त होत आहे.

दरवर्षी पावसाळा संपला की डेंगी डासांचा उपद्रव वाढतो. हे सामान्यांना माहिती जसे असते तसेच आरोग्य केंद्रे, नगरपालिका व ग्रामपंचायतींनाही माहिती असते. सध्याच्या माहितीनुसार डेंगीसदृश्य रुग्णांची संख्या वाढत आहे.

दरवर्षी पावसाळा संपला की डेंगी डासांचा उपद्रव वाढतो. हे सामान्यांना माहिती जसे असते तसेच आरोग्य केंद्रे, नगरपालिका व ग्रामपंचायतींनाही माहिती असते. सध्याच्या माहितीनुसार डेंगीसदृश्य रुग्णांची संख्या वाढत आहे.

शहरासह तालुक्यात काही रुग्ण असल्याचे शासकीय यंत्रणेचीच माहिती आहे. तथापि डेंगी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना होत नसल्याचे दिसते. खाजगी रुग्णालयांनी डेंगी रुग्णांची माहिती रोज ग्रामीण रुग्णालयाला द्यावी, असे पत्र यंत्रणेने दिले असले तरी असे अहवाल दिले जात नसल्याचे समजते.

तालुक्यातील ग्रामीण भागात आम्ही खबरदारी घेत आहोत. आमचे सर्व्हेक्षण सुरु आहे.

- शैला डांगे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी

शहरात धूर फवारणी करण्याबाबत पालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. खाजगी डॉक्टरांना डेंगी रुग्णांबाबत माहिती देण्याचे पत्रे देण्यात आली मात्र माहिती मिळत नाही.

-सविता ससाणे, प्रभारी

पालिका प्रशासन केवळ धूरफवारणी करु शकते. ती शहरात सगळीकडे झाली आहे. डेंगीबाबत आमच्यावर इतर काही जबाबदारी नाही.

- प्रमोद ढोरजकर, मुख्याधिकारी, नगरपालिका

मुख्याधिकाऱ्यांनी केले वर हात

डेंगी वाढू नये यासाठी पालिकेने काय उपाययोजना केली या प्रश्नावर पालिकेचे मुख्याधिकारी ढोरजकर यांनी हात वर केले. पालिका फक्त धूर फवारणी करते, डेंगी होवू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेचे काम आहे ते आमचे नाही असे सांगून नागरीकांच्या आरोग्याबाबत वर हात केले.

उपाय

स्वच्छ साठणारे पाणी काढणे

बांधकामाच्या साईटवर पाणी साठते ते काढणे

कोरडा दिवस पाळणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT