ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar Drought : पावसाअभावी तलाव कोरडे; जामखेडवर दुष्काळाचे सावट खैरी, मोहरीतील पाणी राखीव

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, खैरी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा आणि मोहरी लघुपाटबंधारे तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

जामखेड तालुका - पावसाअभावी जामखेड तालुक्यातील ११ लघुपाटबंधारे तलावांपैकी तब्बल सात तलाव कोरडेठाक आहेत, तर खैरी मध्यम प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणीसाठा असल्याने तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने खैरी व मोहरी तलावांतील पाणी राखीव ठेवले आहे.

जामखेड तालुक्यात सरासरीच्या केवळ ९२ टक्केच पाऊस झाला आहे. हा पाऊस विस्कळीत स्वरूपात झाल्याने या तलावांमध्ये पाणीसाठा झाला नाही. सप्टेंबरच्या शेवटी झालेल्या पावसामुळे तालुक्यात खरीप पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले, तर या पावसाच्या ओलीवरच रब्बी ज्वारीच्या पेरण्या शेतकरी करताना दिसत आहेत.

विंचरणा नदीवरील ११९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेला भुतवडा तलाव व ४८.२५ दशलक्ष घनफूट क्षमता असलेला भुतवडा जोड तलाव आणि ८३.७० दशलक्ष घनफूट क्षमता असलेला रत्नापूर लघुपाटबंधारे तलाव गेल्या महिन्यांत पाटोदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्ण क्षमतेने भरले. मात्र, अन्य सात तलाव कोरडेठाक राहिल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.

५३३.६० दशलक्ष घनफूट क्षमता असणाऱ्या खैरी मध्यम प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणीसाठा आहे, तर ६२.५० दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मोहरी तलावात ३४.९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, खैरी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा आणि मोहरी लघुपाटबंधारे तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

योगेश चंद्रे, तहसीलदार.

लघुपाटबंधारे तलाव

(कंसात साठवण क्षमता)

धोंडपारगाव (८७.९३)

पिंपळगाव आळवा (१००.४९)

अमृतलिंग (४८.४०)

धोत्री ( ५५.६०)

नायगाव (८३.७६)

तेलंगशी (३७.९४)

जवळके ( ३६.१९)

बंधाऱ्यांतील साठा

(कंसात क्षमता)

जवळा - १५.३७ (४३.२५)

कवडगाव - ९.०० ( ०.७१)

गिरवली - २.७४ ( २२.७८)

पिंपरखेड - ११.३३ (२३.४०)

सांगवी - ४.५७ ( ३०.४५)

मंडलनिहाय पाऊस

(कंसात टक्केवारी)

जामखेड - ६०६.९ मिमी (१०४.२)

अरणगाव - ४७३.३ मिमी (८२)

खर्डा - ४८३ मिमी ( ८३)

नान्नज - ५१८ मिमी ( ८९)

नायगाव - ५१८ मिमी (१००.३)

एकूण - ५३३.४ मिलिमीटर (९२ टक्के)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mundhwa Land Fraud Case: मुंढवा जमीन गैरव्यवहारात मोठी कारवाई! पोलिसांनी निबंधक कार्यालयातून कागदपत्रे जप्त केली

Dog Attacks : नागरिकांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ला झाल्यास महापालिका, ग्रामपंचायतींना द्यावे लागणार उत्तर; सुप्रिम कोर्टाचा निर्णय

Kolhapur News: ओबीसी महिला प्रवर्गामुळे रंगणार बहुरंगी सामना; कळेत राजकीय घराण्यांची धावपळ वाढली!

Success Story: अठरा वर्षांच्या अंतरानंतर ‘ती’ बनली सनदी लेखापाल; वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केली तयारी

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर ATCमध्ये मोठा बिघाड, ९०० विमानांना विलंब तर २० उड्डाणे रद्द; ३६ तासांनतर काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT