suspended  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : कोपरगावमध्ये पाच कर्मचारी निलंबित

करनिर्धारण यादी तपासणीकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : शहरातील वाढीव घरपट्टीप्रकरणी ठेकेदाराने केलेल्या सर्वेक्षणाची व सादर केलेल्या यादीची योग्य पद्धतीने तपासणी न केल्याचा ठपका ठेवत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी कर विभागातील पाच कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले.

याबाबत मुख्याधिकारी गोसावी म्हणाले, की गेल्या दीड वर्षापासून शहरातील वाढीव हद्दीसह मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण करण्यासाठी नागपूर येथील आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीस ठेका देण्यात आला. ठेकेदार कंपनीने सर्वेक्षण करून कर निर्धारण यादी कर विभागाला सादर केली होती. मालमत्ता सर्वेक्षणाकरिता सादर केलेल्या अर्जांची कर विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांनी तपासणी करावी, अशा स्पष्ट सूचना कर अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तसेच प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून ज्या मिळकतींत त्रुटी आहेत, त्याबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. तसेच सर्वेक्षण केलेले अर्ज तपासून जमा करण्याचे आदेश कर अधिकाऱ्यांना दिले होते.

मालमत्ताकरामध्ये क्षेत्रफळ, बांधकामातील बदल, जमिनीच्या क्षेत्रातील वाढ, याबाबत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्याबाबत हरकती घेतल्या होत्या. या हरकतींची पाहणी केली असता, त्यात तथ्य असल्याचे समोर आल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन करण्यात आले असून, पुढे शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

शहरात घरपट्टीवाढीच्या मूल्यांकनाची यादी तपासण्यात निष्काळजीपणा केल्यामुळे पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र ज्या ठेकेदाराने चुकीचे सर्वेक्षण केले, त्या ठेकेदार कंपनीवरही रीतसर कारवाई करणार आहे.

- शांताराम गोसावी,मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT