Ahmednagar power supply  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : वीजपुरवठ्यासाठी ठिय्या आंदोलन

कान्‍हूर पठारचे आक्रमक शेतकरी महावितरण कार्यालयाच्‍या दारात

सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर : कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील महावितरण उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या किन्ही, बहिरोबावाडी, तिखोल या गावांमधील शेतकऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण कार्यालयासमोर शेतकरी नेते अनिल देठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. कनिष्ठ अभियंता ए. बी. भुजबळ यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.(Ahmednagar power supply News)

या भागातील कृषिपंपांना मागील एक महिन्यापासून सुरळीत व अखंडितपणे वीजपुरवठा होत नसतानाही, सोमवारपासून महावितरण कंपनीने कृषिपंपांच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केल्याने, संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान कार्यालयात कनिष्ठ अभियंता उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दोन तासांनी कनिष्ठ अभियंता भुजबळ आंदोलनस्थळी आले. आंदोलक शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून शेतीसाठी सुरळीत व पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होत नसल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्‍न उपस्थित केला.

यापुढे सुरळीत व अखंडितपणे वीजपुरवठा न मिळाल्यास एकही शेतकरी वीजबिल भरणार नाही, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, भुजबळ व आंदोलकांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन, शेतीचा वीजपुरवठा जोपर्यंत सुरळीत व अखंडितपणे होणार नाही, तोपर्यंत वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे आश्वासन भुजबळ यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित झाले.

उपसरपंच हरेराम खोडदे, माजी सरपंच मानसिंग देशमुख, किसन खोडदे, माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग व्यवहारे, बापू व्यवहारे, राजाराम देठे, यशवंत व्यवहारे, संजय खोडदे, सखाराम खोडदे, मारुती सावंत, गंगाधर देठे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : आंतरराज्य घरफोडी, चोरी प्रकरणातील दोन सराईत आरोपींना बेंगलोर येथून अटक

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT