Ahmednagar news esakal
अहिल्यानगर

Ahmednagar : आरोग्य जागृतीचा उपक्रम स्तुत्य

डॉ. आशुतोष मैड; का. ल. शिंदे व्याख्यानमालेत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा

राहाता : स्वातंत्र्यसेनानी का. ल. शिंदे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आरोग्यविषय जागृती शिबिराचे आयोजन करून शारदा शैक्षणिक संकुलाने स्तुत्य उपक्रम हाती घेतला. देशातील प्रत्येक नागरिकाचे डिजिटल हेल्थ कार्ड तयार करण्याची महत्त्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हाती घेतली. राहाता येथील डॉ. मैड मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात केंद्र सरकारच्या आरोग्य योजना उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन राहाता येथील डॉ. मैड मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. आशुतोष मैड यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील शारदा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक का. ल. शिंदे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश शिंदे होते. प्रा. शरद गमे, प्रा. सोपान मोरे, उपप्राचार्य विद्या गोडगे, मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे आदी यावेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिक का. ल. शिंदे पाटील यांचे जयंती वर्ष हे गुणवत्ता सुधार वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची व अध्यापनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातील. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सरकारी आरोग्य योजनांची माहिती व्हावी व डॉ. मैड मल्टिस्पेशालीटी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला व्हावा यासाठी हा उपक्रम हाती घेतला.

डॉ. मैड रुग्णालयाचे अनिकेत गाडेकर यांनी पंतप्रधान जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच हेल्थ कार्ड बाबत माहिती दिली. यावेळी शुभम पवार उपस्थित होते. प्रा. रमेश आहेर यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. राजेंद्र पटारे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT