Ahmednagar In Navodaya Vidyalaya Corona infiltration  Canva
अहिल्यानगर

अहमदनगर : नवोदय विद्यालयात कोरोनाचा शिरकाव

16 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षक, 1 सफाई कामगार आले पॉझिटिव्‍ह

सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली होती. यातच टाकळी ढोकेश्वरमधील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील 19 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात 15 मुली, 1 मुलगा, 1 सफाई कामगार व 2 शिक्षकांचा समावेश आहे. या सर्वांना पारनेरमधील ग्रामीण रूग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिली.

या बाबत माहिती अशी की, विद्यालयातील 9 विद्यार्थ्यांना गुरुवारी कोरोनासदृश आजाराची लक्षणे आढळल्याने त्यांची तपासणी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. या तपासणीत विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आले, या सर्वांच्या संपर्कात असलेल्या 10 जणांची तपासणी केली असता तेही बाधित निघाले.

या 19 जणांना पारनेर ग्रामीण रुग्णालयातील शासकीय कोव्हिड सेंटरमध्ये आरोग्य विभागाने उपचारासाठी दाखल केले. विद्यालयात पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, नगर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये आहे. इयत्ता दहावी व बारावीचे अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी नवोदय विद्यालयामध्ये बाहेरून आले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून बाधा झाली असण्याची शक्यता नवोदय विद्यालयाच्या प्रशासन व पारनेर आरोग्य विभागाने व्यक्त केली.

या घटनेची माहिती समजताच तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ सतीश लोंढे, डॉ अन्विता भांगे, डॉ. स्वाती ठुबे या आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने 410 जणांचे नमुने घेतले. जिल्ह्यातून येथे आलेल्‍या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार शिवकूमार आवळकंठे यांनी केले अाहे. संबंधीत तहसीलदारांना तशा सूचना दिल्या आहेत.

"नवोदय विद्यालय प्रशासनाने कोविडबाबतची संपूर्ण खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्वच विद्यार्थ्यांची आरोग्य विभागामार्फत तपासणी व्हावी. ज्या पालकांनी यापूर्वीच आपले पाल्य घरी नेले आहेत. त्यांनी स्वतः व विद्यार्थी यांनी ही आपली कोविड टेस्ट करून घ्यावी. विद्यार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण होईपर्यंत किमान छोट्या वर्गांचे अध्यापन ऑनलाइन पद्धतीने करावे."

- भास्कर नरसाळे, पालक, जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT